भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे डान्स व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच धनश्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान चाहत्यांनी तिला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विषयी काही प्रश्न विचारले आहेत.

धनश्रीने इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me Anything’च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका चाहत्याने तिला ‘विराट कोहली विषयी सांग’ असे म्हटले. त्यावर धनश्रीने विराटसोबतचा फोटो शेअर करत चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ‘त्याच सेंस ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. त्याला जेव्हा भेटतो तेव्हा आनंद होतो’ असे म्हटले आहे.

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Raj Thackeray Padwa melava
“राज ठाकरे ठरवतील तीच धर्माची बाजू असेल”, मनसेच्या वरिष्ठ नेत्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
Even today Hindus are insecure in the country says Praveen Togadia
‘हिंदूंच्या विकासासाठी हनुमान चालीसा विकास यंत्रणा!’ प्रवीण तोगडिया म्हणाले…

आणखी वाचा : ‘ये काली काली आंखे गाण्यात काजोलला पाहून…’, २८ वर्षांनंतर शिल्पा शेट्टीने केला खुलासा

दुसऱ्या एका यूजरने ‘अनुष्का विषयी काही सांग’ असे म्हटले. त्यावर धनश्रीने ‘ती माणूस म्हणून खूप चांगली आहे’ असे म्हटले आहे. त्यासोबतच धनश्रीने अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे.

Anushka Sharma, dhanashree, virat kohli, yuzvendra chahal,

धनश्री आणि अनुष्काचे बॉडिंग चांगले असल्याचे पाहायला मिळते. त्या दोघी अनेकदा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी एकत्र बसलेल्या दिसतात. त्या दोघींचे बऱ्याच वेळा फोटो देखील सोशल मीडियावर चर्चेत असतात.

Anushka Sharma, dhanashree, virat kohli, yuzvendra chahal,

धनश्री एक डॉक्टर असून ती एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून काम करते. धनश्रीचा स्वतःचा एक डान्स स्टुडीओ देखील आहे. याव्यतिरिक्त धनश्रीचं स्वतःचं यू-ट्यूब चॅनेल आहे. तिच्या यू-ट्यूब चॅनेलचे २० लाखा पेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत.