01 December 2020

News Flash

तुमच्यातल्या वेडेपणाचा सन्मान – YZ अवॉर्ड्स !

सन्मान होईल तुमच्यातल्या हटके जगण्याच्या पद्धतीचा, तुमच्यातल्या अटीट्युडचा

अत्यंत अनोखं नाव असलेल्या YZ चित्रपटाकडून YZ अवॉर्ड्स जाहीर होत आहेत ! निर्माते, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट चे संजय छाब्रिया आणि प्रतिसाद प्रॉडक्शनचे अनीश जोग ह्यांच्या, YZ  ह्या अत्यंत चर्चेत असलेल्या चित्रपटाचं लेखन क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शन समीर विद्वांस ह्या दिग्गज जोडीनं केलं असून चित्रपटात सागर देशमुख, अक्षय टांकसाळे, सई ताम्हणकर ,पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे, हे सगळेच आपल्या कसदार अभिनयातून नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या भूमिकांमधून दिसणार आहेत .
आत्तापर्यंत चित्रपटांना अवॉर्ड्स मिळत आले आहेत पण YZ ह्या हटके नाव असलेल्या हटके चित्रपटाकडूनच ‘YZ अवॉर्ड्स’ हे हटके अवॉर्ड्स दिले जाणार आहेत ! ह्या  अवॉर्ड्स साठी तुम्हीही पात्र ठरू शकता ! अवॉर्ड च्या नावात ‘YZ’ जरी असलं तरी इथे खूपच वेगळा अर्थ अभिप्रेत आहे ! इथे सन्मान होईल तुमच्यातल्या हटके जगण्याच्या पद्धतीचा, तुमच्यातल्या अटीट्युडचा !
तुमच्याकडे जर एखादी भन्नाट कला, छंद, शोध किंवा एखादा अभिनव उपक्रम म्हणजे एखादं सामाजिक कार्य, भन्नाट कलाप्रकार  की जो जोपासण्यासाठी तुम्ही अक्षरशः वेडे झाले आहात तर ह्या अवॉर्डच्या निवड प्रक्रियेसाठी तुम्ही तुमची एंट्री देऊ शकता. त्यातून दहा विजेते एका पॅनेल मार्फत निवडले जातील. १२ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या आगामी YZ ह्या चित्रपटाच्या टीमकडून, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर जरी हे अवॉर्ड्स दिले जाणार असले तरी आता दरवर्षीच हे अवॉर्ड्स देण्यात येतील. भन्नाट गोष्टीचा भन्नाट ध्यास घेतलेली कोणतीही व्यक्ती, संस्था ह्या स्पर्धेत सहभागी होऊ शकते पण ह्या ध्यासाच्या मागे असतांना ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या तारखा मात्र लक्षात ठेवा ! १५ जुलै ते २८ जुलै ह्या काळात आमच्याकडे आपल्या प्रवेशिका पाठवायच्या आहेत. विजेत्यांना आणि त्यांच्यातील YZ पणाला ट्रॉफी आणि आकर्षक बक्षिसांनी सन्मानित केलं जाईल . आम्हाला आपली माहिती आणि आपण करत असलेल्या भन्नाट गोष्टीचा प्रूफ वजा फोटोyzawards2016@gmail.com ह्या पत्त्यावर मेल करा किंवा facebook.com/yzthefilm इथे मेसेज करा.
yz1

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 4:23 pm

Web Title: yz awards
Next Stories
1 छत्रपती शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटात सलमान खान
2 अमेरिकेत दोन तासात ‘कबाली’च्या तिकीटांची विक्री
3 ‘हॅमिल्टन’ एक सांगीतिक वादळ!
Just Now!
X