01 December 2020

News Flash

झपाटून काम करणाऱ्यांसाठी ‘वायझेड’ पुरस्कार

सामाजिक काम करत असेल तर अशा प्रेक्षकाला ‘वायझेड’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

मराठी चित्रपट आणि त्यातील विविध गटांसाठी वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. चित्रपटाच्या प्रेक्षकांसाठी कोणताही पुरस्कार देण्यात येत नाही. पण आता ही उणीव आगामी ‘वायझेड’या चित्रपटाच्या चमूने भरून काढली आहे. प्रेक्षकांकडे एखादी भन्नाट कला, छंद असेल किंवा वेडं होऊन व झपाटून जाऊन कोणी काही सामाजिक काम करत असेल तर अशा प्रेक्षकाला ‘वायझेड’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. एव्हरेस्ट एन्टरटेंटमेंटचे संजय छाब्रिया आणि प्रतिसाद प्रॉडक्शनचे अनिश जोग यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सागर देशमुख, अक्षय टांकसाळे, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, मुक्ता बर्वे हे कलाकार आहेत.या पुरस्कारासाठी अशा प्रकारे झपाटून जाऊन काम करणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. एका निवड समितीकडून दहा जणांची निवड केली जाणार आहे. हा चित्रपट येत्या १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून त्यानिमित्ताने हे पुरस्कार दिले जाणार आहेत. स्पर्धत कोणीही व्यक्ती किंवा संस्थेला सहभागी होता येणार आहे. पुरस्कारासाठी येत्या २८ जुलैपर्यंत प्रवेशिका पाठवायच्या आहेत. प्रवेशिकेसोबत छायाचित्र आणि कामाची माहिती yzawards2016@gmail.com या संकेतस्थळावर पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 12:15 am

Web Title: yz awards for audience
Next Stories
1 सिक्स पॅक अॅब्सची गरज नाही, सलमानचा आमिरला सल्ला
2 मला त्याला ठार मारावेसे वाटते; रणवीरच्या ‘त्या’ डान्सवर सलमानची प्रतिक्रिया
3 हॅपी बर्थडे कतरिना..!
Just Now!
X