अभिनेत्री झायरा वसीमने काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सोडण्याविषयीची पोस्ट लिहित सर्वांनाच धक्का दिला होता. ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या झायराने धर्माचं कारण देत चित्रपटसृष्टीला रामराम केला. तिच्या या निर्णयाचं काहींनी स्वागत केलं तर काहींनी तिच्यावर टीका केली. आता झायराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन पोस्ट लिहिली आहे.

रस्त्यावरचा एक फोटो पोस्ट करत झायराने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘तुमच्या आतील ऊर्जेला विझू देऊ नका. एकाकीपणात, नैराश्यात तुमच्या आतील हिरोला मरू देऊ नका. जे तुम्हाला हवं आहे, ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता.’ एका प्रसिद्ध लेखकाने लिहिलेल्या या ओळी झायराने शेअर केल्या आहेत.

आणखी वाचा : पॉकेटमनीसाठी ही मराठमोळी अभिनेत्री करायची बूट पॉलिश; आता हृतिकसोबत करतेय काम

गेल्या काही दिवसांपासून झायराने सोशल मीडियावर धर्माशी निगडीत पोस्ट शेअर केल्या आहेत. तिच्या इन्स्टा स्टोरीमध्येही कुराणातील बरीच वाक्य पोस्ट केल्याची पाहायला मिळतात. झायराचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण हा तिच्या करिअरमधला शेवटचा चित्रपट असेल. यामध्ये ती फरहान अख्तर व प्रियांका चोप्रा यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.