25 October 2020

News Flash

‘आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो…’, लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री

तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती लीलावती रुग्णालयावर भडकली असल्याचे दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये तिने तिच्या सोबत लीलावती रुग्णालयता घडलेली घटना सांगितली आहे.

झरीनने तिच्या सोबत लीलावती रुग्णालयता घडलेली घटना व्हिडीओमध्ये सांगितली आहे. एक दिवस रात्री झरीनच्या आजोबांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना उपचरासाठी लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये एक कोविड वॉर्ड आहे. तेथे प्रत्येक रुग्णाचे तापमान चेक केले जाते आणि माझ्या आजोबांचे एकद नॉर्मल तापमान होते. कारण लॉकडाउननंतर तिचे आजोबा त्या दिवशी पहिल्यांदा बाहेर पडले होते. तरी देखील त्यांची करोना चाचणी करण्यास सांगितले.

 

View this post on Instagram

 

This happened last night. No help provided to my 87yr old grandfather who was in so much pain. #Shame #Disappointed #ZareenKhan

A post shared by Zareen Khan (@zareenkhan) on

‘मी आता पर्यंत फक्त मित्रपरिवाराकडून ऐकले होते की काही झालं तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये रुग्णालयात जाऊ नका. त्यांनी सध्या बिझनेस खोलला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या आजोबांना उपचाराची गरज होती. तरी त्यांना कळाले नाही. ज्यांना आपण कोविड वॉरिअर म्हणतो जेव्हा त्यांची आपल्याला गरज असते तेव्हा ते असे वागतात’ असे तिने म्हटले आहे. शेवटी झरीन तिच्या आजोबांना घेऊन घरी आली आणि तिला माहिती असलेली औषधे त्यांना दिली. दुसऱ्या दिवशी तिने दुसऱ्या डॉक्टरांकडे उपचार घेलते. झरीनच्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 11:21 am

Web Title: zareen khan angry on lilavati hospital avb 95
Next Stories
1 धक्कादायक! ‘आई माझी काळूबाई’ मालिकेच्या सेटवरील २२ जणांना करोनाची लागण
2 पाकिस्तानी झेंड्यासह राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, काय आहे सत्य
3 “..त्यामुळे मला फार दु:ख झालं”; सोनू सूदने सांगितलं ‘मणिकर्णिका’ सोडण्यामागचं खरं कारण
Just Now!
X