08 March 2021

News Flash

झरीनच्या घरी रंगतोय ‘हॉरर’ सिनेमा अन् मालिकांचा खेळ!

हा चित्रपट माझ्यासाठी आव्हानात्मक असेल.

अभिनेत्री झरीन खान

‘हेट स्टोरी ३’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेनंतर झरीन खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. विक्रम भट्ट यांच्या आगामी चित्रपटातून ती एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विक्रम भट्ट यांच्या ‘१९२१’ या भयपटातील मुख्य अभिनेत्याचा शोध सुरु असताना, या चित्रपटात झळकणाऱ्या स्त्री व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्री झरीनने तयारी सुरु केली आहे. चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी झरीन तिच्या दैनंदिनीमधील रात्रीचा वेळ खास भयपट मालिका आणि चित्रपट पाहाण्यासाठी घालवत आहे.

आगामी चित्रपटाविषयी बोलताना झरीन म्हणाली, “मी आतापर्यंत हॉरर चित्रपटामध्ये काम केले नाही. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी आव्हानात्मक असेल. विक्रम भट्ट यांच्यासोबत काम करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे.” यापूर्वी झरीन विशाल पांड्या यांच्या हेट स्टोरी या चित्रपटात दिसली होती. सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या चित्रीकणाला नोव्हेबरमध्ये सुरुवात होणार आहे. चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी चित्रपट निर्मात्यांकडून खास कार्यशाळेचे नियोजन करण्यात येणार आहे. विक्रम भट्ट यांच्या आगामी चित्रपटाचे कथानक संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांभोवती फिरताना दिसणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये नक्कीच उत्सुकता असेल.

झरीनच्या चित्रपटाविषयी बोलायचे तर, २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अक्सर’ या चित्रपटाच्या सिक्वल असणाऱ्या ‘अक्सर २’ मध्ये झरीन दिसली होती. तिच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले होते. त्यानंतर तिने ‘हेट स्टोरी ३’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटातील गाणी आणि बोल्ड सीन यांमुळे झरीन चांगलीच चर्चेत आली होती.  विक्रम भट्ट यांच्या विषयी बोलायचे तर, त्यांनी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये श्रृंगारिक आणि रोमांचक चित्रपट दिले आहेत.  ‘गुलाम’, ‘राज’, ‘हेटस्टोरी’, ‘क्रिचर ३डी’, ‘खामोशिया’ यांसारखे अनेक चित्रपट त्याने बॉलीवूडला दिले आहेत. त्याच्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्साह पाहायला मिळतो. त्यामुळे आगामी चित्रपटाबद्दलही प्रेकांच्यात उत्साह नक्कीच दिसेल. त्याच्या या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत कोण्या नव्या नायकाला संधी देईल का? पुन्हा एकदा जुन्या अभिनेत्यासोबत काम करेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 3:51 pm

Web Title: zareen khan starts preparing for vikram bhatts film 1921
Next Stories
1 ‘सुनील तू कपिलला माफ कर’
2 ‘क्वीन’च्या दिग्दर्शकाने तरुणीसोबत गैरवर्तणूक केल्याचे वृत्त फेटाळले
3 भोसले वाड्यात निर्मला आणणार भूत!
Just Now!
X