News Flash

‘ही’ अभिनेत्री साकारणार पंतप्रधान मोदींच्या आईची भूमिका

लोकांना ही भूमिका नक्की आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिकांवरून हळूहळू पडदा उठत आहे. अमित शहा, जशोदाबेन यांच्या भूमिकेनंतर आता मोदींची आई हिराबेन यांची भूमिका साकारणार कोण यावरूनही पडदा उठला आहे.

मालिका आणि रुपेरी पडद्यावरच्या ज्येष्ठ अभिनेत्री झरीना वहाब हिराबेन यांची भूमिका साकारणार आहे. मी आतापर्यंत साकारलेली ही सर्वात वेगळी भूमिका आहे. लोकांना ही भूमिका नक्की आवडेल असा विश्वास झरीना यांनी व्यक्त केला आहे. अभिनेत्री बरखा बिश्त ही जशोदाबेन यांच्या भूमिकेत आहे.

तर मराठी, हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात बोमन इराणी, दर्शन कुमार, सुरेश ओबेरॉय यांसारखे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. २३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. तर उमंग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 12:59 pm

Web Title: zarina wahab to play prime minister narendra modi mother
Next Stories
1 Video : ‘गली बॉय’च्या अभिनयाची छाप विल स्मिथवर
2 शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ‘टोटल धमाल’च्या टीमनं जमवला ५० लाखांचा निधी
3 एकल पालकत्वावरुन ट्रोल करणाऱ्यांना करणचं सडेतोड उत्तर
Just Now!
X