News Flash

‘नाकातून रक्त काढून दाखवा ना’, आण्णा नाईक ते स्वप्नील जोशी कलाकारांनी सांगितले आवडते मीम

पाहा कलाकरांचे आवडते मीम कोणते.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. अशातच नेटकरी काही चित्रपट, मालिकेतील काही सीन्सवर भन्नाट मीम्स तयार करताना दिसतात. असेच काही मीम्स मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कलाकरांवर तयार करण्यात आले होते. खुद्द कलाकरांनी त्यांच्यावर तयार केलेल्या मीम्स पैकी आवडलेल्या मीम विषयी सांगितले आहे.

झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२०-२०२१ नुकताच पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावलेल्या काही कलाकारांनी त्यांच्यावर तयार करण्यात आलेल्या मीम्स विषयी सांगितले आहे. झी मराठी वाहिनीने या कलाकारांचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

आणखी वाचा : “मराठी अभिनेत्री बोल्ड फोटो शेअर करु शकत नाही का?” तेजस्विनी पंडितने व्यक्त केला संताप

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अभिनेता स्वप्नील जोशी त्याच्यावर तयार करण्यात आलेल्या मीम्स पैकी सर्वात भन्नाट मीम विषयी बोलत आहे. एका यूजरने त्याच्या फोटोखाली कमेंट करत ‘सर, नाकातून रक्त काढून दाखना ना’ असे लिहिले होते. त्याचा स्क्रीनशॉट एक मीम म्हणून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता असे स्वप्नील बोलताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

पुढे आण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर बोलताना दिसत आहे. अण्णा हजारे आणि अण्णा नाईक यांची तुलना करणारे मीम सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ते अफलातून होते असे माधव म्हणाले. या मीममध्ये एका बाजूला अण्णा हजारे यांचा फोटो आणि दूसरीकडे अण्णा नाईक यांचा शेवंतासोबतचा फोटो वापरण्यात आला होता. त्या मीमवर ‘अण्णा उपाशी अण्णा तुपाशी’ असे लिहिण्यात आले होते. ‘अर्थात या मीम्सद्वारे अण्णा हजारे यांचा अवमान करण्याचा कोणाचाही हेतू नाही’ असे त्यांनी म्हटले आहे.

व्हिडीओमध्ये पुढे नुकताच लग्न बंधनात अडकलेली अभिनेत्री मिताली मयेकर बोलत आहे. तिला आवडलेल्या मीम्स पैकी एक मीम म्हणजे त्यांच्या लग्नाच्या फोटोवर तयार करण्यात आले होते. मिताली आणि सिद्धार्थ चांदेकरच्या लग्नातील एका फोटोमध्ये वाड्यातील तीन खिडक्या आहेत. एका खिडकीमध्ये सिद्धार्थ दिसत आहे तर एका मिताली. आणि मधल्या रिकाम्या खिडकीमध्ये झपाटलेल्या चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांचा फोटो लावून मीम तयार करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 3:05 pm

Web Title: zee marathi awards 2020 celebrity speaks about viral memes on them avb 95
Next Stories
1 Filmfare 2021: इरफान खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, पाहा कोणकोण ठरले पुरस्काराचे मानकरी
2 मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हृतिक-सुझान आले एकत्र
3 ‘३ इडियट्स’मधील रँचो आणि फरहानला झाला करोना, राजूला वाटते भीती म्हणाला..
Just Now!
X