News Flash

अटकेनंतर अजितच्या डोक्यात सुरु झाली नव्या खेळीची समीकरणं

भर लग्नमंडपातून अजितला अटक झाल्यानंतर, झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकत नाहीये

अजित त्याची केस स्वत:च लढणार असं ठरवतो

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका ‘देवमाणूस.’ एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत किरण गायकवाड याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.

भर लग्नमंडपातून अजितला अटक झाल्यानंतर, झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकत नाहीये. अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागलेयत यासाठी तो डिंपलची मदत घेतोय. इकडे सगळं गाव डॉ. अजितच्या मागे उभं आहे कारण तो गावासाठी देवमाणूस आहे. पण ACP दिव्या सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम आहे. तिने अजित विरुद्धचे सगळे पुरावे गोळा केलेत आणि ते मी कोर्टातच सगळ्या जगासमोर आणेन आणि या देवमाणसामागे लपलेला खरा चेहेरा बाहेर आणेन असं सांगते.

आणखी वाचा : आता ‘द फॅमिली मॅन ३’; मनोज वाजपेयी लढणार चीनशी?

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

दरम्यान, डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग खटल्याची कोर्टाची तारीख पडलेय, पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना संपूर्ण गाव बाहेर जमलाय. अजित त्याची केस स्वत:च लढणार असं ठरवतो. दिव्या आणि सरकारी वकील यांना अजितच्या चतुरपणाची कल्पना येते. डिंपलच्या घरातील सगळे अजूनही अजितच्या बाजूने आहेत. समोर येणारे साक्षीपुरावे पाहून ते देखील संभ्रमात आहेत. आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी औसुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 4:54 pm

Web Title: zee marathi devmanus serial ajitkumar devisingh update avb 95
Next Stories
1 बलात्काराचा आरोप असलेल्या पर्ल पुरीला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींवर देवोलीना संतापली!
2 तरला जोशी यांच्या निधनानंतर सहकलाकार निया शर्मा भावूक
3 “सुशांत ड्रग्ज घेतो हे कुटुंबीयांना माहिती होते”, रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा
Just Now!
X