News Flash

‘कानाला खडा’मध्ये रामदास आठवलेंचा प्रेक्षकांना खास ‘कानमंत्र’…!!

कानाला खडा लावणारे प्रसंग कोणते हे जाणून घेण्यास प्रेक्षकही उत्सुक आहेत.

कानाला खडा कार्यक्रमात रामदास आठवलेंची उपस्थिती

झी मराठीवरच्या प्रसिद्ध ‘कानाला खडा’ या कार्यक्रमात दर आठवड्याला अनेक सेलिब्रिटी, राजकारणी येतात. या कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यात कानाला खडा लावणारे धम्माल, गंमतीशीर किस्से प्रेक्षकांना ऐकायला मिळतात. अल्पावधित लोकप्रिय ठरलेल्या या शोमध्ये आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.

झी मराठीनं नुकताच या मालिकेचा प्रमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक संजय मोने या कार्यक्रमातून कलाकारांचे कधीही न ऐकलेले किस्से उलगडतात. कार्यक्रमात आलेला प्रत्येक सेलिब्रिटी कानाला खडा लावणारे त्याच्या आयुष्यातील अनेक मजेशीर गोष्टी सांगतात. कलाकरांचे हे न ऐकलेले मजेशीर किस्से प्रेक्षकांनाही ऐकायला आवडतात. या मंचावर पहिल्यांदाच रामदास आठवले उपस्थित राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे प्रसंग कोणते हे जाणून घेण्यास प्रेक्षकही उत्सुक आहेत.

एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये संजय मोने यांनी कनाला खडा लावणाऱ्या प्रसंगाबद्दल रामदास आठवले यांना विचारले. या प्रश्नाचं रामदास आठवले यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. आज आणि शनिवारी रात्री रामदास आठवले यांची उपस्थिती असलेल्या कानाला खडाचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 6:50 pm

Web Title: zee marathi kanala khada special episode with ramdas athawale
Next Stories
1 अभिनंदन परतायच्या आत निर्मात्यांना लागले चित्रपटाचे वेध
2 दीपिका नाही तर हा असेल भन्साळींच्या आगामी चित्रपटातला नवा चेहरा
3 ऑस्कर विजेता अभिनेता करणार बॉण्डपटात विलनचा रोल
Just Now!
X