महाराष्ट्रात पुन्हा संचारबंदी सुरु आहे. पुन्हा एकदा करोनामुळे मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. अशातच आता मालिकांचे नवे भाग पहायला मिळणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आपल्या आवडत्या मालिकांचे नवे भाग सुरूच राहणार आहेत.

१८ एप्रिलला “घेतला वसा टाकू नको” आणि “माझा होशील ना” या मालिकांचा १ तासांच्या विशेष भागा पाहायला मिळणार आहे. पौराणिक कथा आणि चातुर्मासातले व्रतवैकल्य यावर आधारित ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेच्या “कहाणी गुढीपाडव्याची”चा एका तासाचा भाग दुपारी १२ वा. आणि संध्या. ७ वा. दाखवण्यात येणार आहे. तसेच सोमवार पासून याच मालिकेतून ‘रामनवमी’ विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. या विशेष भागांमध्ये भगवान श्रीराम यांच्या जन्माआधी पासून ते श्रीराम जन्मापर्यंतची रंजक कहाणी दाखवण्यात येणार आहे.

‘माझा होशील ना’ ही मालिका आता एका वेगळ्या वळणार येणार आहे, मनालीवरून परत आल्यावर ब्रह्मे घरावर आणि सई आदित्य समोर अनेक नवीन आव्हाने असणार आहेत. गुलप्रीत हीच बंधू मामाची बायको आहे हे घरातल्या सगळ्यांना कळणार आहे, तसेच दादामामाची बायको सिंधूने घराचा ताबा घेतला आहे. तिकडे ‘जेडी’चा आदित्य ग्रुप ऑफ कंपनीवर डोळा आहे. या सर्व आव्हानांना हे कुटुंब कसं सामोरं जाईल? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मध्ये तुम्ही पाहू शकाल मोमो सोबत ओमचा साखरपुडा संप्पन होईल की शकू मावशी रॉकीच्या मदतीने स्वीटू आणि ओमला एकत्र आणेल? हे येत्या भागातच कळेल.‘अग्गबाई सुनबाई’ मध्ये सोहमचं खरं रूप आसावरी समोर येईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिकांच्या आगामी भागमध्ये मिळणार आहेत.