‘कसं काय मंडळी हसताय ना? हसायलाच पाहिजे’, असे म्हणत प्रेक्षकांच्या हास्याची काळजी घेणारे कलाकार युरोप वारीत रमले होते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने काही दिवसांसाठी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही परदेशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना खळखळून हसवण्यातही या निलेश साबळे आणि त्याच्या टीमला यश मिळाले आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी म्हणून गेलेल्या या संपूर्ण टीमने त्यानंतर युरोप वारी करण्याचाही निर्णय घेतला. परदेशात गेल्यावर विविध ठिकाणांना या कलाकार मंडळींनी आवर्जून भेट दिली.

कुशल बद्रीकेने सोशल मीडियावरुन याचे फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये त्याने श्रेया बुगडेला टॅग केले आहे. श्रेयानेही सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही सुरेख फोटो पोस्ट करत चाहत्यांना युरोप सफर घडवली आहे, असे म्हणायला हरकत नाही. दोन जिवल मित्र एखाद्या नव्या ठिकाणी ज्या आनंदात आणि स्वच्छंदपणे वावरतात त्याचप्रमाणे श्रेया आणि कुशलनेही युरोप पालथा घातला असे म्हणायला हरकत नाही.

https://www.instagram.com/p/Bbbak00hrKk/

रण, कुशलने फोटो पोस्ट करताना त्यासोबत दिलेल्या कॅप्शनमधून त्यांनी युरोपवारीत धमाल केल्याचा अंदाज लावता येणे सहज शक्य आहे.
‘तसे आम्ही ‘जय-वीरूच’, फिरणे, शॉपिंग करणे हा मुख्य उद्देश आणि वेळ मिळालाच तर चित्रीकरण वगैरे आहेच….’ असे कॅप्शन देत त्याने फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये त्याने चाहत्यांचेही आभार मानले आहेत. एखादा कलाकार प्रत्येक क्षणी चाहत्यांचा ऋणी असतो, हे कुशलच्या या पोस्टमध्येही एका वेगळ्या अंदाजातून पाहायला मिळाले.

पाहा : VIDEO : ‘घुमर’ करत दीपिका म्हणतेय ‘दिसला गं बाई दिसला’

https://www.instagram.com/p/BbhPxlDBmno/