फार पूर्वीपासून चित्रपट आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत. चित्रपट बहुधा मनोरंजनाच्या उद्देशाने बनवलेले असतात. यातील काही चित्रपट वेगळ्या धाटणीचे आहेत. ज्यांची मांडणी, थिम थोड्या अनोख्या पद्धतीने आखलेल्याआहेत. असेच काही विशेष ५ चित्रपट झी टॉकीज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे, ज्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
७ सप्टेंबर पासून दररोज संध्याकाळी ७ वाजता हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘लयभारी’ या अॅक्शनपटाने या चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली. या सुपरहिट अॅक्शन पटाद्वारे रितेश देशमुखने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. तर या चित्रपटामध्ये जेनेलिया देशमुख, शरद केळकर, राधिका आपटे, उदय टिकेकर यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत. पुढील चित्रपट असणार आहे “सैराट”. समाजातील भेदभावामुळे निर्माण झालेली तेढ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर मांडण्यात आलेली आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असून या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांनाविशेष आकर्षित केले होते. ८ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि ओम भुतकर, महेश मांजरेकर, मोहन जोशी आणि उपेंद्र लिमये यांच्या मुख्य भूमिका असलेला, गुन्हेगारी विश्वावरआधारित असलेला ‘मुळशी पॅटर्न’ ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीसयेणार आहे. 2018 मधील हा चित्रपट पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका कुटूंबाभोवती आधारित असून गुन्हेगारी विश्वातील खरी परिस्तिथी या चित्रपटात मांडण्यात आलेली आहे.
आदिनाथच्या खोडकर स्वभावावर आधारित ‘माझा छकुला’ हा सिनेमा १० सप्टेंबर रोजी प्रसारित होणार आहे. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ यांनी या चित्रपटात विशेष भूमिका साकारलेल्या आहेत. वास्तविक घटनेवर आधारित, मिलिंद लेले दिग्दर्शित “बांदिशाळा” 11सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे यांच्यासह शरद पोंक्षे, उमेश जगताप, आनंद अलकुंटे, आनंद कारेकर, पंकज चेंबूरकर, कृतिका गायकवाड यांच्या मुख्य भूमिका आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2020 3:07 pm