मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये विनोदी कलाकारांचे योगदान फार मोठे आहे. म्हणूनच गेली ७ वर्षे झी टॉकीज सातत्याने या कलाकारांचा सन्मान करत आहे. झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सतर्फे या सर्व कलाकारांच्या योगदानाबद्दल त्यांना मानाचा मुजरा केला जातो. लवकरच झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानिमित्ताने झी टॉकीजने खास विनोदी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. २६ ऑक्टोबर पासून या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजता हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

या चित्रपट महोत्सवाची सुरुवात अशी ही बनवाबनवी या सुपरहिट चित्रपटाने होणार आहे. गेली ३२ वर्ष हा चित्रपट प्रेक्षकांना पोट धरून हसवत आहे. जेष्ठ अभिनेते दादा कोंडके यांच्या विनोदी भूमिका अजूनही अजरामर आहेत. दादा कोंडकेंचा पळवा पळवी २७ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सावळा कुंभार आणि त्याचं हुशार गाढव आपल्या सगळ्यांच्या अजूनही समरणात आहे. हे गाढव काय काय धमाल करतं हे गाढवाचं लग्न या चित्रपटातून २८ ऑक्टोबर रोजी पाहायला मिळेल.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
bade miyan chote miyan release date
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले, दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

प्रथमेश परब आणि ह्रितिका श्रोत्री यांचा टकाटक २९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भाऊ कदम आणि अशोक सराफ यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट आलटून पालटून ३० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपट महोत्सवाचा शेवट आम्ही सातपुते या तुफान कॉमेडी चित्रपटाने होणार आहे. सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ आणि स्वप्नील जोशी या कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट गुंफलेला आहे. २६ ऑक्टोबरपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत दररोज संध्याकाळी ७ वाजता झी टॉकीजवर हा चित्रपट महोत्सव रंगणार आहे.