News Flash

रविवारी ‘टॉकीज मनोरंजन लीग’ मध्ये कॉमेडीचा तडका

११ एप्रिल रोजी टॉकीज मनोरंजन लीग मध्ये कॉमेडी चित्रपटांची जुगलबंदी

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी झी टॉकीज हि नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तत्पर असते. सदाबहार चित्रपट, खास कार्यक्रम सादर करून या वाहिनीने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं आहे आणि यापुढेही करत राहील. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी टॉकीज मनोरंजन लीग मधून सदाबहार चित्रपट सादर करत आहे.

गेल्या रविवारी सुरु झालेल्या या लीग मध्ये भक्तिपर चित्रपट दाखवण्यात आले. येत्या रविवारी म्हणजेच ११ एप्रिल रोजी टॉकीज मनोरंजन लीग मध्ये कॉमेडी चित्रपटांची जुगलबंदी रंगणार आहे.

येत्या रविवारी सकाळी ९ वाजल्या पासून प्रेक्षकांच्या घरी हास्यस्फोट सुरु होईल असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हमाल दे धमाल हा सुपरहिट चित्रपट प्रसारित होणार आहे. त्यानंतर हास्यसम्राट दादा कोंडके यांचा पोट धरून हसायला लावणारा ‘पळवा-पळवी’ हा चित्रपट दुपारी १२ वाजता, तर गेली ३२ वर्ष प्रेक्षकांचं तितकच मनोरंजन करणारा सदाबहार चित्रपट अशी हि बनवाबनवी दुपारी ३ वाजता प्रसारित होईल. मकरंद अनासपुरे यांचा धमाल विनोदी सिनेमा गाढवाचं लग्न संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि या कॉमेडी चित्रपटांच्या मॅरेथॉनचा शेवट रात्री ९ वाजता पुन्हा एकदा दादा कोंडके यांच्या मला घेऊन चला या सुपरहिट चित्रपटाने होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 3:38 pm

Web Title: zee talkies sunday special movie avb 95
Next Stories
1 कुणाल कामरा आणि त्याचे आई वडील करोनाबाधित
2 दिवंगत अभिनेत्री शशिकला यांच्या आठवणीत अभिनेते धर्मेंद्र भावूक
3 दिया मिर्झाने साजरा केला सावत्र मुलीचा वाढदिवस, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X