News Flash

झी टॉकीजवर चित्रपट महोत्सव; दशकातले दहा खास चित्रपट होणार प्रसारित

६ जुलै ते १७ जुलै दरम्यान दररोज संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज हे खास चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

झी टॉकीज वाहिनीवर मागील दशकातील खास १० ब्लॉकबस्टर चित्रपट जुलै महिन्यात प्रसारित होणार आहेत. ६ जुलै ते १७ जुलै दरम्यान दररोज संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज हे खास चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

नाना पाटेकरांच्या अभिनयाने अजरामर झालेला ‘नटसम्राट’ ६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. २०१६ सालचा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिलेला सुपरहिट चित्रपट म्हणजे सैराट. ‘एक विलक्षण प्रेमकहाणी’ म्हणून ओळखला जाणारा काकस्पर्श ८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे . चित्रपट सृष्टीतील समीक्षकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं होतं. सचिन खेडकर, मेधा मांजरेकर, प्रिया बापट, सविता मालपेकर, केतकी माटेगावकर या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. रंपाट हा चित्रपट ९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मिथुन आणि मुन्नी हे २ उदयोन्मुख कलाकार अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबई मध्ये येतात, आणि मग सुरु होतो त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एका छोट्या खेड्यात राहणाऱ्या ८ वर्षांच्या चैतन्य भोवती गुंफलेला ‘नाळ’ १३ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमा गृहात सलग १०० दिवस हाऊसफुल अशी पाटी झळकवणारा ‘लय भारी’ १४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. नगरपालिकेत झाडूवाला असणारा आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी धडपडणाऱ्या बबनला एके दिवशी पैशांची खाण मिळते. यामुळे तो कसा कुटुंबापासून दुरावला जातो आणि स्वतःचा विनाश करून घेतो, याची कथा नशीबवान चित्रपटात १५ जुलै रोजी पाहायला मिळणार.

२०१५ साली देऊळ बंद या चित्रपटाद्वारे प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन क्षेत्रात प्रदार्पण केले. देवावर विश्वास नसणाऱ्या शास्त्रज्ञाची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिका साकारत असून मोहन जोशी, दीपक करंजीकर, निवेदिता सराफ या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. १६ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या फिल्म फेस्टिवलची सांगता १७ जुलै रोजी ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाने होणार आहे. बाबांनी दिलेली एलिझाबेथ ही सायकल ज्ञानेश आणि मुक्ता या भावंडांना काही कारणांमुळे विकावी लागते. या भावंडांची सायकल परत मिळवण्यासाठी चाललेली धडपड या चित्रपटाद्वारे रेखाटण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 7:52 pm

Web Title: zee talkies to telecast 10 blockbuster movies in the month of july
Next Stories
1 गुंजा सा है कोई इकतारा! चाहतीने ताऱ्याला दिलं सुशांतचं नाव
2 विराट-हार्दिक पुश-अप्सवर चॅलेंज: पाहा नताशाची रोमँटिक कमेंट
3 ‘ब्रीद’च्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चनसोबत दिसणार हृषिकेश जोशी
Just Now!
X