News Flash

‘Indian Idol 12’ च्या सेटवर ‘झीनी बेबी’ची एन्ट्री; रिक्रिएट केला १९७९ सालच्या ‘द ग्रेट गॅम्बलर’चा सीन

अभिनेत्री जीनत अमान या एका होडीमध्ये बसलेल्या आहेत. हातातलं फुल आणि चेहऱ्यावर हास्य फुलवत त्यांनी एपिसोडमध्ये खरी रंगत आणली.

एकेकाळी आपल्या बोल्ड भूमिकांमुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री झीनत अमान यांचे आजही त्यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. नुकताच एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये बॉलिवूडच्या ‘झीनी बेबी’च्या जुन्या अंदाजातली अभिनयाची जादू पहायला मिळाली. स्टेजवर स्पर्धकांनी त्यांच्या ‘दोन लफ्जों’ या सुपरहिट गाण्यावर परफॉर्मन्स केला. हे पाहून अभिनेत्री झीनत अमानना रहावलं नाही आणि त्या सुद्धा स्टेजवर आल्या आणि या रोमॅण्टिक गाण्याचा सीन रिक्रिएट करण्यात आला. यावेळी स्टेजवर झीनत अमान यांची अदा आणि सौंदर्य पाहून सेटवर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. अभिनेत्री झिनत अमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सोनी टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हि़डीओ शेअर केलाय. अभिनेत्री झीनत अमान या नुकतंच लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ मध्ये प्रमुख पाहूणे कलाकार म्हणून आल्या होत्या. या एपिसोडमध्ये अभिनेत्री झीनत अमान यांना ट्रिब्यूट देण्यात आलं. अभिनेत्री झीनत अमान यांना चित्रपट क्षेत्रात ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी स्पर्धकांनी त्यांच्या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्मन्स दिला. या एपिसोडला स्पर्धक दानिशने आणखी स्पेशल बनवंल. दानिशनेने ‘है अगर दुश्मन’ या गाण्यावर आपला सुपर परफॉर्मन्स दिला. यावर परिक्षकांनी त्याचं कौतूक देखील केलं. यावेळी दानिशने अभिनेत्री झीनत अमानकडे एक मागणी केली ती फक्त स्वतः झीनत अमानच पूर्ण करू शकत होत्या.

दानिशने झीनत अमान यांच्याकडे ‘द ग्रेट गॅम्बलर’ चित्रपटातलं सुपरहिट गाणं ‘दो लफ्जों’ या गाण्याचा सीन रिक्रिएट करून त्यांच्यासोबत स्टेज शेअर करण्याची मागणी केली. यावर अभिनेत्री झीनत अमान यांनी हसत हसत मागणी पूर्ण करण्यासाठी तयारी दाखवली.

या सीन रिक्रिटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जीनत अमान या एका होडीमध्ये बसलेल्या आहेत. त्यांच्या हातातलं फुल आणि चेहऱ्यावर हास्य फुलवत त्यांनी एपिसोडमध्ये खरी रंगत आणली. झीनत अमान यांचा हा रोमॅण्टिक सीन पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक या एपिसोडची मोठ्या आतुरतेने वाटत पाहत आहेत.

अभिनेत्री झीनत अमान या ७० ते ८० च्या दशकातील टॉप अभिनेत्री आहेत. त्यांनी ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘यादों की बारात’, ‘हीरा पन्ना’, ‘रोटी’ ‘कपड़ा और मकान’, ‘प्रेम शास्त्र’, ‘अजनबी’, ‘वारंट’, ‘बाल‍िका वधू’, ‘कलाबाज’, ‘धर्मवीर’, ‘शालीमार’, ‘हीरालाल पन्न’ यासारख्या अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. झीनत अमान अजुनही चित्रपटात काम करत आहेत. ‘पानीपत’ चित्रपटात सकीना बेगमच्या भूमिकेत त्या झळकल्या होत्या. लवकरच त्यांची ‘Margaon: The closed file’ हा आगामी चित्रपट भेटीला येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 3:05 pm

Web Title: zeenat aman dances on do lafzon ki hai song indian idol 12 episode video prp 93
Next Stories
1 सोनालीने कर्करोगावरील उपचार घेतानाचा जुना फोटो केला ट्वीट; म्हणाली…
2 मार्वल स्टुडिओच्या ‘मिस मार्वल’मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान झळकणार?; नेटकऱ्यांमध्ये चर्चा
3 सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच – अन्विता फलटणकर
Just Now!
X