News Flash

झीनत अमान यांना अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या व्यावसायिकाला अटक

त्यांनीही त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून आपले सर्व आर्थिक व्यवहार त्याच्याकडे सोपवले.

झीनत अमान

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना धमकावणारा आणि पाठलाग करणाऱ्या मुंबईतील व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. झीनत यांनी काही दिवसांपूर्वीच या व्यावसायिकाविरोधात जुहू पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आरोपीवर भारतीय दंडसंविधानाच्या कलम ३०४ ड (पाठलाग करणे) आणि कलम ५०९ (महिलेला अपमानास्पद वागणूक देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाचा : धक्कादायक! ‘पद्मावत’च्या शोदरम्यान चित्रपटगृहातच तरुणीवर बलात्कार

गेल्या काही काळापासून झीनत अमान आणि तो व्यावसायिक एकमेकांना ओळखत होते. पण, त्यानंतर काही कारणांमुळे झीनत यांनी त्याच्याशी बोलणे थांबवले. त्यामुळे त्या व्यावसायिकाने सतत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने झीनत अमान यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक अश्लील मेसेजही पाठवले होते तसेच, काही दिवसांपूर्वी त्याने झीनत यांच्या घरात घुसून गैरवर्तन करत तेथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचेही वृत्त आहे.

वाचा : धक्कादायक! २३ वर्षीय अभिनेत्रीचा ट्रेनमध्ये विनयभंग, सहप्रवाशांची बघ्याची भूमिका

झीनत अमान यांच्या एका जवळच्या व्यक्तीने डेक्कन क्रोनिकलला सांगितले की, त्या व्यावसायिकाने त्याच्यामार्फत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी झीनत यांचे मन वळवले होते. त्यांनीही त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून आपले सर्व आर्थिक व्यवहार त्याच्याकडे सोपवले. त्यानंतर पण, त्याने झीनत अमान यांचे साठवलेले पैसे संपवले, आता तर त्यांच्याकडे फक्त घरच राहिेले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर फारच अडचणी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 3:02 pm

Web Title: zeenat amans stalker arrested by juhu police
Next Stories
1 Video: ‘वीरे की वेडिंग’मध्ये दिसेल जिमी शेरगिलचा अनोखा अंदाज
2 मुलीसाठी अभिनेत्याने घेतला धार्मिक समजूतींपासून दूर राहण्याचा निर्णय
3 धक्कादायक! २३ वर्षीय अभिनेत्रीचा ट्रेनमध्ये विनयभंग, सहप्रवाशांची बघ्याची भूमिका
Just Now!
X