News Flash

“आता लाजही वाटत नाही”; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका

'तो' व्हिडीओ पाहून अभिनेता पोलिसांवर प्रचंड संतापला

“आता लाजही वाटत नाही”; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका

मध्यप्रदेशात सध्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी एका बाईला व तिच्या लहान मुलाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या पोलिसांवर अभिनेता जीशान अय्यूब याने संताप व्यक्त केला आहे. “आता आपल्याकडे लाज देखील उरलेली नाही” असं म्हणत त्याने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

अवश्य पाहा – बहिणीला वाचवताना त्याला ९० टाके पडले; सुपरहिरोंनीही केला ६ वर्षांच्या हिरोला सलाम

जीशानने मध्यप्रदेशातील त्या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओवर त्याने “अभिनंदन! अखेर आपण आपल्या देशाला सुपरपावर बनवले. लाज वाटत नाही का असंही आता विचारणार नाही. कारण आता ते देखील विचारावसं वाटत नाही.” अशा आशयाची कॉमेंट केली आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – “केलेल्या पापांची याच जन्मात फळं भोगावी लागतील”; अभिनेत्याने केली सलमानवर टीका

जीशान अय्यूब बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता आहे. २०११ साली ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘जन्नत २’, ‘ठग्स ऑफ हिंदूस्तान’, ‘मनिकर्णिका’, ‘झिरो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. जीशान अभिनयासोबतच सोशल मीडियावरील पोस्टमुळेही चर्चेत असतो. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 6:07 pm

Web Title: zeeshan ayyub criticized mp police over viral video mppg 94
Next Stories
1 नयनताराने ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये शाहरुखसोबत काम करण्यास दिला होता नकार?
2 “बॉलिवूडमध्ये बाहेरुन येणाऱ्यांची एवढी चिंता आहे तर…”; स्वराचा सल्ला
3 Video : कुणाल खेमूच्या आगामी ‘लुटकेस’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X