News Flash

Zero box office collection : किंग खानची जादू ओसरली? पहिल्या दिवशी कमाई जेमतेम

शाहरूख खानचा 'झिरो' हा सिनेमा भारतात ४,४०० आणि विदेशात १५०० स्क्रीनवर झळकला आहे.

झीरो

शाहरूख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांचा ‘झिरो’ हा सिनेमाकडून रेकॉर्ड तोड ओपनिंची आशा केली होती. मात्र, किंग खानच्या झिरोला पहिल्या दिवशी जेमतेम कमाई करता आली आहे. त्यामुळे किंग खान शाहरूखची बॉक्स ऑफिसवरील जादू ओसरली का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. शाहरूखच्या झिरोने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास २०.१४ कोटी रूपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाला हवी तशी ओपनिंग मिळाली नाही, मात्र शनिवार आणि रविवारी या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा केल्या जात आहेत.

शाहरूख खानचा ‘झिरो’ हा सिनेमा भारतात ४,४०० आणि विदेशात १५०० स्क्रीनवर झळकला आहे. या चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपये आहे. शाहरूखच्या झिरो या चित्रपटाची कमाई जब हॅरी मेट सेजल या त्याच्या चित्रपटापेक्षा अधिक आहे. शाहरूखच्या जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाला पहिल्या दिवशी १५.२ कोटींची ओपनिंग मिळाली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 12:33 pm

Web Title: zero box office collection day 1 shah rukh khan film earns rs 20 14 crore
Next Stories
1 अर्जुन रामपाल अडचणीत, कंपनीने केली फसवणूकीची तक्रार
2 सिध्दार्थचे सामाजिक भान, बीडच्या अनाथ मुलांना केली आर्थिक मदत
3 कतरिना म्हणतेय, गेल्या दहा वर्षांत एकानंही मला डेटसाठी विचारलं नाही
Just Now!
X