20 February 2019

News Flash

Video : ..म्हणून चाहत्याने केलेला ‘तो’ खास व्हिडिओ शाहरुखने केला शेअर

शाहरुखला हा व्हिडिओ आवडला असून त्याने तो शेअरदेखील केला आहे.

'झिरो' फनी अॅनिमेटेड व्हिडिओ व्हायरल

आनंद एल.राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून या टीझरने सर्वांचेचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा बादशहा अर्थात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. पण याच गोष्टीवरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं असून त्याच्या एका चाहत्याने या टीझरचा एक अॅनिमेटेड व्हिडिओ तयार केला आहे. मात्र शाहरुखला हा व्हिडिओ आवडला असून त्याने तो शेअरदेखील केला आहे.

झिरोची तुलना काही ट्रोलकऱ्यांनी ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ या टीव्ही सीरिजमधल्या एका भूमिकेशी केली असून काही हास्यास्पद मीम्ससुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातच आता हा अॅनिमेटेड व्हिडिओ आला असून सध्या त्याचीच चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून शाहरुखलाही तो आवडल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या हा व्हिडिओमध्ये युट्युब चॅनलवर अपलोड करण्यात आला असून हा व्हिडिओ पाहताच शाहरुखने तो व्हिडिओ त्याच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर करत व्हिडिओ तयार करणाऱ्याचे आभार मानले आहेत.

‘हा व्हिडिओ मस्त झाला असून तो तयार करण्यासाठी धन्यवाद’, असं शाहरुखने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे. शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट येत्या २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा, कतरिना कैफ या अभिनेत्रीही झळकणार आहेत.

 

First Published on July 12, 2018 12:45 pm

Web Title: zero unofficial animated teaser video release online