‘सर्जा’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पूजा पवार यांनी नवोदित कलाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता शशांक केतकरसोबतचा एक किस्सा सांगत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या व्हिडीओनंतर शशांकनेही माफी मागितली.

काय म्हणाल्या पूजा पवार?

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

“एका मालिकेत मी आणि शशांकने एकत्र काम केलं होतं. त्याच्या आईची भूमिका मी साकारली होती. त्यानंतर एका नाटकादरम्यान मी त्याला पाहिलं. मात्र तेव्हा त्याने मला ओळखच दाखवली नाही. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं”, असं त्या व्हिडीओत म्हणाल्या.

शशांक केतकरची दिलगिरी

पूजा पवार यांच्या या व्हिडीओनंतर शशांकनेही माफी मागितली. “माझ्याकडून असं काही घडलं असेल तर मी मनापासून माफी मागतो. मी वयाने आणि अनुभवांनी लहान आहे आणि याची मला पूर्ण कल्पना आहे. पूजा ताई नाटकाला आली होती आणि आम्ही बोललो ही होतो, असं मला तरी आठवतंय. असो.. रिस्पेक्टबद्दल बोलायचं झालं तर मी माझ्या लहानपणापासून प्रत्येकाचाच रिस्पेक्ट करत आलो आहे. जे मला ओळखतात ते माझ्या अपरोक्षसुद्धा हे नक्कीच सांगू शकतील की मी असा नाही. माझ्या नाटकाला आलेला प्रत्येक प्रेक्षक हे सांगू शकेल की प्रयोग संपल्यावर, अगदी शेवटचा प्रेक्षक भेटून बाहेर पडल्याशिवाय मी कधीच थिएटरमधून बाहेर पडत नाही.”

“माझ्या आई बाबांकडून, शिक्षकांकडून, आजूबाजूच्या सगळ्याच कलाकारांकडून मी कायमच आदर आणि प्रामाणिकपणा शिकत आलो आहे. मी ताईला फोनसुद्धा करेन, तिच्याशी बोलेन. यापेक्षा अधिक कुणालाही कुठलंच स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत नाही”, अशा शब्दांत त्याने दिलगिरी व्यक्त केली.