News Flash

Video: गाडी बंद न करताच हृतिक खाली उतरला अन्….

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मधील भन्नाट किस्सा

या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज १० वर्षे झाली आहेत.

बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ, कल्कि कोचलिन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्षे झाली आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया चित्रपटातील एक मजेशीर किस्सा…

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाची निर्माती जोया अख्तरने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत चित्रपटातील काही सीन दाखवण्यात आले आहेत. या सीनमध्ये हृतिक, फरहान आणि अभय बार्सिलोना ते कोस्टा ब्रावा प्रवास करत असतात. हृतिक गाडी चालवत असतो. दरम्यान हृतिकला ऑफिसमधून एक फोन येतो. फोनवर बोलण्यासाठी तो गाडी घाटात रस्त्याच्या बाजूला लावतो आणि गाडीतून खाली उतरतो. पण हृतिक गाडीतून उतरताना गाडीचा हँड ब्रेक लावायला विसरतो. हृतिक खाली उतरताच गाडी पुढे सरकते. फरहान गाडीतून उडी मारतो आणि गाडीत बसलेला अभय घाबरतो. पण हृतिक पटकन येऊन गाडी बंद करतो.

आणखी वाचा : ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सीक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला? हृतिकने केला खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Baby (@tigerbabyfilms)

व्हिडीओमध्ये अभय बोलता की, ‘हृतिकमुळे मी आणि फरहान मरणारच होतो. फरहान खूप फास्ट आहे. तो गाडी पुढे सरकत आहे हे पाहून तातडीने उडी मारतो आणि मी मरणार हाच विचार करत बसलो होतो.’

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचे जोया अख्तरने दिग्दर्शन केले आहे. तसेच चित्रपटाला म्यूझिक शंकर एहसान लॉयने दिले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 4:22 pm

Web Title: zindagi na milegi dobara turns 10 avb 95
Next Stories
1 ‘ये दिल मांगे मोअर’, अंगावर रोमांच उभे करणारा कॅप्टन विक्रम बत्राच्या शौर्यावर आधारीत ‘शेरशाह’चा टीझर प्रदर्शित
2 वडिलांच्या कवितांचे रेकॉर्डिंग करत आहेत बिग बी; सोशल मीडियावर शेअर केला फोटो
3 ‘या’ कारणामुळे करिश्मा कपूरने ‘दिल तो पागल है’ सिनेमासाठी दिला होता नकार
Just Now!
X