News Flash

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सीक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला? हृतिकने केला खुलासा

आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १० वर्षे झाली आहेत.

या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ, कल्कि कोचलिन मुख्य भूमिकेत आहेत.

बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी प्रेक्षक ते तितक्याच आवडीने आजही पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा.’ या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ, कल्कि कोचलिन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील हृतिक, अभय आणि फरहान या तिघांच्या मैत्रीच्या विशेष चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्षे उलटली आहेत. त्यानिमित्ताने हृतिक रोशनने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ‘जिंदगी ना मिलेगा दोबारा’ या चित्रपटाच्या सीक्वेल विषयी वक्तव्य केले आहे.

हृतिकने ‘बॉम्ब टाइम्स’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाच्या सीक्वेल विषयी विचारण्यात आले होते. तेव्हा तो म्हणाला, ‘नक्कीच सीक्वेल होऊ शकतो. तो पुढच्या ५ वर्षांनी येणार की १५ हे माहिती नाही. लोकांना चित्रपटाचा सीक्वेल हवा म्हणून झोया तो करेल असे मला वाटत नाही. पण जर तिला मनातून वाटले तर ती नक्की त्यावर काम करेल’ असेल हृतिक म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचे जोया अख्तरने दिग्दर्शन केले आहे. तसेच चित्रपटाला म्यूझिक शंकर एहसान लॉयने दिले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता चाहते या चित्रपटाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 1:33 pm

Web Title: zindagi na milegi dobara turns 10 hrithik roshan opens up on the films sequel avb 95
Next Stories
1 शाही जोडप्यासोबत प्रियांका चोप्राची ‘ती’ वागणूक पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर
2 ‘तुला हे करावं लागेल…’, ‘मोमो’ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
3 प्रवीण तरडे सांगणार बलुचिस्तानातील मराठ्यांची विजयगाथा; ‘बलोच’ चित्रपटाची घोषणा