प्रेमभावनेवर आजवर बऱ्याच चित्रपटांची निर्मिती झाली आणि पुढेही होत राहतील. प्रेमात असलेल्यांना संपूर्ण जग सुंदर दिसत असतं आणि प्रत्येक व्यक्ती चांगली वाटत असते. थोडक्यात ते त्यांना प्रेमाची झिंग असल्यामुळे भासत असतं. अशाच मानसिकतेवर आधारित ‘झिंग प्रेमाची’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विजय उषा बॅनरखाली विजयकुमार सपकाळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून या सांगीतिक रोमँटिक लव्ह स्टोरीचं दिग्दर्शन केलंय शाहिद खान यांनी. बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून नावाजलेले शाहिद खान यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लिहिलं असून त्यांचं ‘झिंग प्रेमाची’ चित्रपटातून मराठीत दिग्दर्शकीय पदार्पण होत आहे.

या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील गाणी ताज महाल आणि लाल किल्लासारख्या ऐतिहासिक ठिकाणी चित्रित करण्यात आली आहेत. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महालला निखळ प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि याच ठिकाणी या चित्रपटातील गाणं चित्रित झालं आहे.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

वाचा : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकणारे अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

एकाच गावात राहणारे दीपक आणि ज्योती यांचं एकमेकांवर अतोनात प्रेम असतं परंतु गाव, समाज आणि त्यांच्या घरच्यांचा प्रखर विरोध असतो. रविकांत हा गावगुंड त्यांच्याबाबतीत अनेक अफवा पसरवतो आणि त्यामुळे दोघांच्या घरातल्यांचा रोष अजूनच वाढत जातो. ज्योतीचा भाऊ विशाल समंजस असतो आणि ज्योती आणि दिपकचे एकमेकांवरील प्रेम पाहून त्यांना पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला देतो. त्याच्या मदतीने ते गावातून पसार होतात का आणि शहरात जाऊन आपला संसार थाटणार का यावर चित्रपटाचं कथानक आधारित आहे.

वाचा : गुगलवर ‘धडक’च्या सर्चने नेटकरी सैराट

या चित्रपटातून संदेश गौर आणि शीतल तिवारी हे नवीन चेहरे मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहेत. त्यांच्यासोबत अमोल चौधरी, रतन सोमवरे व अनिल मोरे हेदेखील मराठीत पदार्पण करीत असून त्यांना रंजीत जोग, स्मिता पवार, मोहक कंसारा, मृणालिनी जांभळे, जयराम शाहू, विपुल देशपांडे, पोपटराव चव्हाण, दिपज्योती नाईक, स्मृती पाटकर आणि गणेश यादव यांची मोलाची साथ लाभली आहे.