Rakhi Sawant Boyfriend Adil Khan: राखी सावंतने काल बिग बॉस मराठीच्या घरात दमदार एंट्री घेतली. घरात येताच राखीने आपला जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक सदस्याची खबर घेऊन राखीने काही खास माणसांना टार्गेट केले होते. अपूर्वा नेमळेकर, किरण माने, विकास सावंत यांना राखीने कडक शब्दात सुनावलं. तर तेजस्वी लोणारच्या नावाची पाटीच काढून टाकून राखीने घरातील आपलं मुख्य टार्गेट कोण असणार हे अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं आहे. एकीकडे राखीने बिग बॉसमध्ये आपली जादू दाखवायला सुरुवात केली असता घराबाहेर राखीचा बॉयफ्रेंड आदिल सुद्धा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. तर मंडळी आदिलने नुकतंच एका हॉलिवूड चित्रपटासाठी आपली निवड झाल्याचे सांगितले आहे.

राखी सावंतचा बॉयफ्रेंड म्हणून नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध असणारा आदिल खान हा यापूर्वी तू मेरे दिल मे रहने के लायक नहीं या गाण्यातून राखीसह दिसून आला होता. ही जोडी नेटकऱ्यांमध्ये हिट ठरली होती, काही दिवसांपूर्वीच राखीने आदिलसह अमेझॉन प्राईमसाठी एक वेबसिरीज शूट करणार असल्याचेही सांगितले होते. या वेबसिरीजमध्ये राखीने चक्क नो- किसिंग ऑन स्क्रीन अशी अट ठेवल्याचेही सांगितले होते. राखी आणि आदिल दोघेही लवकरच बिग बॉसच्या घरात येणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. यात राखी मराठी बिग बॉसला तर आदिल बिग बॉस १६ साठी वाईल्ड कार्ड म्हणून जाणार आहे असे समजत होते, मात्र या चर्चांमध्ये आदिलची हॉलिवूड चित्रपटाची घोषणा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

washim lok sabha seat, Govinda s Roadshow in Washim, Receives low Response, mahayuti, canidate rajshri patil, election campaign, govinda Disappointed Fans,
गोविंदाचा रोड शो फसला, कारमध्येच बसून असल्याने नागरिकांची नारेबाजी…..
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या
lok sabha elections 2024
एनडीएत जागावाटपावरून ‘हे’ दोन मित्रपक्ष नाराज; मोदींची साथ सोडून इंडिया आघाडीत जाणार?

आदिलने मीडियाला सांगितले की, जानेवारी २०२३ मध्ये त्याच्या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे, बरं इतकंच नव्हे तर आदिल येत्या वर्षात आणखी दोन चित्रपटातून आपल्या समोर येणार असल्याचेही त्याने म्हंटले आहे.

हे ही वाचा<< .. तर राखी सावंतही बुरखा घालणार; बॉयफ्रेंड आदिल खानसाठी राखीचा मोठा निर्णय

दरम्यान, आदिलच्या घोषणेनंतर नेटकऱ्यांनी मात्र त्याची टेर खेचायला सुरुवात केली आहे. आता खऱ्या अर्थाने तू राखीचा बॉयफ्रेंड शोभतोस अशा कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत. वर्षाला एकही चित्रपट न करणारी राखी स्वतःला बॉलिवूडची राणी म्हणते पण राखीचा आदिल तर याही पुढे जाऊन आता थेट हॉलिवूडच्या गोष्टी करत आहे हे बघून अनेकांना कौतुक, आश्चर्य व गंमत वाटत आहे. आता आदिलच्या या घोषणेत नेमकं किती तथ्य आहे हे जानेवारीत समजेल.