‘तारक मेहता…’ला १३ वर्षे पूर्ण, या वेळेस कलाकार नाही तर दिग्दर्शक होतोय ट्रेंड

२८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता.

tarak-mehta
Photo-Loksatta file

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षा पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका त्यातील कलाकार नेहेमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचे  भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. मात्र सध्या मालिकेच्या कलाकारांनी नाही तर त्यांच्या दिग्दर्शकाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तारक मेहता या मालिकेने आता १४ व्या वर्षात प्रवेश केला आहे. या निमित्ताने दिग्दर्शक मालव राजदा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

२८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आता गेले १३ वर्ष आपल्या अनोख्या अंदाजात ही मालिका लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. १४ व्या वर्षत पद्धर्पण केल्या निमित्ताने सेटवर केक कापून हा दिवस साजरा करण्यात अला. या दरम्यान ‘तारक मेहता का उलटा चष्मा’चे दिग्दर्शक मालव राजदा यांनी या सेलिब्रेशानचे  फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहेत. हे फोटो शेअर करताच तुफान व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे. इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करतं मालव यांनी कॅप्शन मध्ये “गेले १३ वर्ष मी या मालिकेबरोबर काम करतो आहे आणि आता हे १४ वे  वर्ष…..मी अशी आशा करतो की ही मालिका या पुढे ही असंच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.” असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malav Rajda (@malavrajda)

दरम्यान मालिकेत बबीताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता मालिका सोडून जाण्याची चर्चा रंगत होती. नुकतीच ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुनमुनने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडण्यावर तिची प्रतिक्रिया दिली होती. “गेल्या काही दिवसांपासून काही गोष्टींना चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं आहे. या सगळ्याचा माझ्या आयुष्यावर वाईट परिणाम होत आहे. लोक म्हणतं आहेत की मी मालिकेच्या सेटवर जातं नाही, हे खरं नाही. सध्या या शोमध्ये माझ्या उपस्थितीची गरज नाही. त्यामुळे मी सेटवर येत नाही,” असे मुनमुनने सांगितले होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 13 years of sabtv popular show tarak mehta ka ulta chasma director malav rajda post went viral aad

ताज्या बातम्या