प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. यामुळे लाखो चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. याचबरोबर केकेने त्याच्या शेवटच्या शोमध्ये गायलेल्या गाण्यांची एक यादी देखील समोर आली आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?

या यादीमध्ये १८ गाणी लिहिलेली दिसत असून, ही गाण्यांची यादी केकेने स्वत:च्या हाताने लिहिलेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही यादी सध्या स्टेजवर पडल्याचे आढळून आले असून, सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

“अभी अभी तो मिले हो, अभी न करो छूटने की बात…”; ‘केके’च्या शेवटच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ व्हायरल

केके याने माचीस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण केके ला खरी ओळख ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून मिळाली. त्यात त्याने ‘तडप तडप के इस दिल से’ हे गाणे गायले होते. केके चा जन्म २३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्लीत झाला होता. त्याने हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांमध्ये गाणी गायली होती.