या तमिळ अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी आहेत तब्बल २०० सुरक्षारक्षक

टॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव आवर्जुन घेतले जाते

नयनतारा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. ‘वेलइक्करन’ या तिच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण राजस्थान, अजमेर आणि किशनगढ येथे सुरू आहे. असे म्हटले जाते की, या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान नयनताराच्या सुरक्षेसाठी तब्बल २०० सुरक्षारक्षकांची नेमणूक केली गेली आहे. नयनताराची एक झलक पाहता यावी म्हणून तिचे चाहते सेटवर तासन् तास येऊन थांबायचे. ती येणार आहे असे कळताच तिच्या नावाचा एकच जल्लोष करायचे. म्हणूनच तिच्या सुरक्षेसाठी २०० सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले होते.

शाळेत असल्यापासून मॉडेलिंग करणाऱ्या नयनताराने २००३ मध्ये सतयन अंथिकड दिग्दर्शित ‘मनास्सीनाकरे’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमानंतर नयनताराने अनेक हिट सिनेमांत काम केले. आज टॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव आवर्जुन घेतले जाते.

सध्या ‘वेलइक्करन’ सिनेमाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरू आहे. राजस्थानमधील किशनगढ येथे मार्बल डंपिंग यार्डच्या शेजारी या सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. इथे काही दृश्य आणि एका गाण्याचे चित्रीकरण करण्यासाठी काश्मिरचा सेट उभारण्यात आला आहे. गाण्याचे काही फोटोही सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नयनतारा व्हाइट गाऊनमध्ये फार आकर्षक दिसते यात काही शंका नाही. येत्या २२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यंदाच्या वर्षी ‘वेलइक्करन’ या सिनेमाआधी तिचा डोरा हा सिनेमाही येऊन गेला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 200 bouncers stationed in the security of this tamil actress nayantara