|| रेश्मा राईकवार

शोमन सुभाष घई यांचं दमदार पुनरागमन म्हणून ज्या चित्रपटाची चर्चा आहे तो चित्रपट म्हणजेै३६ फार्महाऊसै. हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित झाला आहे, म्हणजे ओटीटीवरचं त्यांचं पदार्पण असंही म्हणता येईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन घई यांनी केलेलं नाही. मात्र चित्रपटाची कथा, गाणी आणि निर्मिती अशी एकूण घई शैलीतील चित्रपट लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न पुरेपूर फसला आहे.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

दूर कुठेतरी एक ३६ फार्महाऊस नावाचा बंगला आहे, जिथे या चित्रपटाची कथा घडते. एक पांढऱ्या केसांची, अतिशय आधुनिक अवतारात राहणारी वृध्द राणी, तिचा केस पांढरे झालेला मोठा मुलगा रौनक सिंग आणि त्यांचे काही नोकर-चाकर हा एवढाच परिवार या आलिशान फार्महाऊसमध्ये राहतो. करोनाकाळाचे संदर्भ जोडण्याचा प्रयत्न हल्ली प्रत्येक चित्रपट वा वेबमालिकेतून केला जातो आहे. इथेही तो झाला आहे. मुंबईतून गावाकडे परतणाऱ्या लोंढ्यातला जयप्रकाश ऊर्फ जेपी हा स्वयंपाकी आणि या फार्महाऊसमधील नोकर बेनीची गाठभेट पडते. आणि ती त्याला या फार्महाऊसमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करण्यासाठी घेऊन येते. वरवर शांत दिसणाऱ्या या फार्महाऊसमध्ये मालमत्तेवरून कटकारस्थानं रंगत आहेत. या फार्महाऊसची सगळी सूत्रं सध्या रौनक सिंगच्या हातात आहेत, राणीने आपल्या या मुलाच्या नावावर मालमत्ता केली आहे, मात्र त्यावर अजून स्वाक्षरी केलेली नाही. तर दुसरीकडे ही मालमत्ता एकट्या रौनकच्या हाती जाऊ नये म्हणून त्याचा भाऊ गजेंद्र आणि दुसऱ्या भावाची बायको मिथिका यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या शह-काटशहाच्या राजकारणात एका वकिलाचा बळी जातो. या वकिलाच्या हत्येचं मूळ फार्महाऊसमध्येच आहे यावर ठाम असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा तपास आणि फार्महाऊसमध्ये जमलेला जे.पी. त्याचा मुलगा हॅरी, इतर नोकरचाकर, खुद्द राणी, रौनक सिंग या प्रत्येकाचे स्वार्थ हे सगळे धागे एकमेकांत गुंतले जातात. हा सगळा गुंता पुरेशा ताकदीने कथेत उतरवण्यातच घई नावाची अनुभवी जादू कमी पडली आहे.

प्रसिध्द दिग्दर्शक -निर्माते सुभाष घईंचा चित्रपट म्हणजे भव्य पट, आलिशान हवेली वगैरे किंवा श्रीमंत-गरीब असे परस्परविरोधी वातावरणातून आलेले नायक-नायिका एकूणच सगळा भव्य डामडौल हे समीकरण असतं. ज्याचा किंचितसाही स्पर्श या चित्रपटात जाणवत नाही. तसं म्हणायचं झालं तर एका अर्थी ही आलिशान हवेलीच आहे, पण तरी कथेच्या शीर्षकानुसार ते फार्महाऊस आहे. घईंचा छाप या चित्रपटात जाणवल्याशिवाय राहात नाही, कारण कथेची मांडणी ही त्यांच्या जुन्या विचारसरणीतून आलेली आहे. त्यामुळे ठरावीक ठोकताळे असलेल्या व्यक्तिरेखा यात आहेत, मात्र त्या व्यक्तिरेखांच्या आजूबाजूची मांडणी इतकी आधुनिक आहे की दोन्हींचा ताळमेळच लागत नाही. चित्रपटाचा जो नायक आहे तो हळवा आहे, हुशारही आहे, थोडासा वाहवत जातो पण सदसद्विवेकबुध्दी मध्येच जागृत होणाराही आहे. गरीब आणि खानदानी रईस हा मुद्दा तर चित्रपटात चवी चवीने पेरला आहे. त्याच्यावरचं विवेचनही ओघाने आलंच आणि ते नायकाकडून येणंही क्रमप्राप्त आहे. नायिकाही मनाने खूप चांगली आहे. त्यामुळे साचेबध्द प्रेमकथा, पियानोच्या धूनवरून गाणं गाणारा नायक हे सगळं सगळं यात आहे. तरीही हा चित्रपट ना प्रेमपट आहे ना धड रहस्यपट. एक खून होतो, खून कोणी केला आहे हे चित्रपटात दाखवलंही जातं. तरीही खुन्यापर्यंत पोहोचेपर्यंत लागणाऱ्या या वेळेत या इतर प्रेमाबिमाच्या, वातावरण थोडं हलकं करण्यासाठी जेपीच्या गंमतीजमतींच्या, गंमतीतल्या लफड्याच्या आणि मधूनमधून सॅनिटायझर, सामाजिक अंतर, मुखपट्टी अशा कित्येक गोष्टी बसवलेल्या आहेत. दिग्दर्शक म्हणून राम शर्मा यांनी केवळ घईंच्या म्हणण्यानुसार फ्रेम लावल्या असाव्यात, असंच वाटत राहतं.

उत्तम कथाकार आणि दिग्दर्शनावर अक्षरश: हुकूमत असलेल्या, हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणाऱ्या सुभाष घईंकडूनै३६ फार्महाऊसैसारख्या टुकार चित्रपटाची अपेक्षाच केली जाऊ शकत नाही. चित्रपटातील कलाकारांची निवड त्यातल्या त्यात वेगळी आणि ताजी आहे असं म्हणता येईल. ओटीटीवरचा चित्रपट असल्यामुळे की काय या माध्यमाचा प्रसिध्द चेहरा असलेल्या अभिनेता अमोल पराशरची यात नायक म्हणून निवड झाली आहे. विजय राज यांनी सणकी रौनक सिंगची भूमिका साकारली आहे. बाकी गंमतीजमतीसाठी अश्विनी काळसेकर आणि संजय मिश्रांसारखे विनोदी अभिनयात मुरलेले कलाकार आहेत. पण या सगळ्याचा प्रभावी वापरच दिग्दर्शकाला करून घेता आलेला नाही. अत्यंत विसविशीत कथामांडणी आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात निदान घईंच्या चित्रपटातील एरव्हीची शोबाजी तरी उत्तमपणे उमटली असती तरी काहीसा दिलासा मिळाला असता. मात्रै३६ फार्महाऊसै हा चित्रपट सगळ्याच पातळ्यांवर घोर निराशा करतो.

३६ फार्महाऊस

दिग्दर्शक – राम शर्मा

कलाकार -अमोल पराशर, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, विजय राज, फ्लोरा सैनी, बरखा सिंग.