VIDEO: ४५ वर्षीय मंदिरा बेदीने साडी आणि हाय- हिल्समध्ये मारले पुश-अप्स

कोणतीही गोष्ट करण्यासाठी बाह्य गोष्टींपेक्षा इच्छा शक्ती दांडगी हवी हेच तिने दाखवून दिले

मंदिरा बेदी

फिटनेस आयडॉल झालेली अभिनेत्री मंदिरा बेदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मंदिरा साडी नेसून पुश- अप्स मारताना दिसत आहे. एका कार्यक्रमात पाहुणी म्हणून गेलेल्या मंदिराला कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने पुश-अप्स मारण्याचे आव्हान दिले. दुसरी एखादी अभिनेत्री असती तर साडी नेसली म्हणून पुश- अप्स मारायला तात्काळ नकार दिला. मंदिराने मात्र तसे केले नाही. तिने क्षणाचाही विलंब न करता पुश- अप्स मारायला सुरूवातही केली. फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाणारी मंदिरा साडीतही त्याच शिताफीने पुश- अप्स मारताना दिसली. यावरुनच कोणतीही गोष्ट करण्यासाठी बाह्य गोष्टींपेक्षा इच्छा शक्ती दांडगी हवी हेच तिने दाखवून दिले.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना मंदिराने लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही काय घातलंय यापेक्षा गोष्ट पूर्ण करणं महत्त्वाचं असतं,’ असा प्रोत्साहनात्मक मेसेज लिहिला. ४५ वर्षीय मंदिराच्या या कृत्याचे अनेकांनी भरभरून कौतुक केले. मंदिराचे वर्क आऊटचे आणि अॅब्जचे फोटो पाहिले तर कोणीही तिचे वय ४५ वर्ष असल्याचे मान्य करणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 45 year old mandira bedi proves age is just a number by working out in a sari

ताज्या बातम्या