67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा आज पार पडला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उपस्थित व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने गौरवण्यात आले. त्यासोबतच अभिनेत्री कंगना रनौतला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर हिंदी चित्रपट विभागात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला.
नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कंगनाला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या गाण्याचे पार्श्वगायक बी प्राक यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यादरम्यान अभिनेते रजनीकांत यांना उपस्थितांनी उभे राहून मानवंदना देत सन्मानित केले. तसेच अभिनेते मनोज बाजपेयी आणि दाक्षिणात्य अभिनेता धनूष या दोघांना विभागून सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. हे सर्व पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. “मी माझा हा पुरस्कार गुरु के. बालाचंद्र यांना अर्पण करत आहे,” असे रजनीकांत यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान कंगना रनौतला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. यापूर्वी तिला फॅशन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. तर क्वीन आणि तनू वेड्स मनू या चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच आनंदी गोपाळ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. तर ‘महर्षि’ हा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना रानौत
- सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट – एलिफेंट डू रिमेम्बर
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – मनोज बाजपेयी
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजय सेतुपती
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) – मनोज बाजपेयी (भोसले), धनुष (असूरन)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणौत (पंगा, मणिकर्णिका)
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – सोहिनी चट्टोपाध्याय
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सावनी रविंद्र (रान पेटलं – Bardo)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजय सेतुपती (सुपर डिलक्स)
- सर्वोत्कृष्ट छायांकन- सविसा सिंह (सोनसी)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- नॉक नॉक नॉक
- सर्वोत्कृष्ट लघू काल्पनिकपट- कस्टडी
- सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार – स्मॉल स्केल वॅल्यू
- बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह – जक्कल
- सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
- सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स
- सर्वोत्कृष्ट कौटुंबिक मुल्य असणारा चित्रपट- ओरु पाथिरा
- सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अनुकूल राज्य – सिक्कीम
- सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक – संजय सुरी रचित ‘अ गांधियन अफेयर: इंडियाज क्यूरियस पोरट्रायल ऑफ लव इन सिनेमा’
- सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक – सोहिनी चट्टोपाध्याय
- विशेष उल्लेखनीय – बिर्याणी (मल्याळम), जोनाकी पोरुआ (आसामी), लता भगवान करे (मराठी), पिकासो (मराठी)
- सर्वोत्कृष्ट चित्रपटस्नेही राज्य- सिक्कीम
- सर्वोत्कृष्ट चित्रपट- मारक्कार सिहाम् SIMHAM (मल्याळम)
- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – महर्षी
- नर्गिस दत्त बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार – ताजमहल
- सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- आनंदी गोपाळ
- सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट – कस्तुरी
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- BAHATTAR HOORAIN (हिंदी)
- सर्वोत्कृष्ट छायांकन – जल्लीकट्टू (मल्याळम)
- बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह चित्रपट – जक्कल
- सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
- सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स