scorecardresearch

वयाच्या ७९ व्या वर्षी अमिताभ बच्चन यांची हाय कीक पाहून; टायगर श्रॉफलाही फुटला घाम, म्हणाला…

अमिताभ यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

amitabh bachchan, tiger shroff,
अमिताभ यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा त्याच्या अॅक्शनसाठी ओळखला जातो. अॅक्शन असो वा डान्स, त्याचे लाखो चाहते आहेत. आता अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावरही टायगर श्रॉफचा प्रभाव पडला आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

वयाच्या ७९ व्या वर्षी अमिताभ बच्चन यांनीही टायगरची हाय किक ट्राय केली आहे. अमिताभ यांनी या अॅक्शन मूव्हचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते टायगर श्रॉफची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहेत. यात अमिताभ यांनी पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि काळी ट्रॅक पॅन्ट परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत “टायगर श्रॉफला त्याच्या या फ्लेक्शिबल किकमुळे खूप लाइक्स मिळाल्याचे पाहिल्यानंतर, मला वाटले की मी देखील अशी किक करण्याचा प्रयत्न करावा. आशा आहे की मला काही लाइक्स मिळतील”, असे कॅप्शन अमिताभ यांनी दिले.

आणखी वाचा : फोटोग्राफर्सकडून धक्का लागल्याने संतापली सारा अली खान, म्हणाली…

आणखी वाचा : इब्राहिम अली खानसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर, पलक तिवारीने पहिल्यांदाच केले वक्तव्य म्हणाली…

आणखी वाचा : “हे पद्मश्रीला पात्र आहेत का?” अक्षय, शाहरूख आणि अजय देवगणच्या तंबाखूच्या जाहिरातीवर भाजपा नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, अमिताभ यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर टायगरने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत टायगर म्हणाला, “बरं… ही संधी साधून मला सगळ्यांचं दाखवायचं आहे…की आपल्या देशातले सगळ्यात मोठे स्टार आणि महान अॅक्शन हीरो जेव्हा माझ्यासाठी काही खास बोलतात, सर काही वर्षांनंतरही जर मी तुमच्यासारखी हाय कीक करू शकलो तर हा नक्की आशीर्वादच असू शकेल.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 79 years old amitabh bachchan copy tiger shroff flexible high kick grand daughter navya naveli react on photos dcp