कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपून बसले गं’ आणि आशा भोसले यांचा स्वर लाभलेली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. सुरेश भट यांनी लिहिलेल्या काही अन्य गझल्स आता पुन्हा एकदा आशा भोसले यांनी गायल्या आहेत. संगीतकार मंदार आगाशे ‘८२-मराठी पॉप आल्बम’ असे या ध्वनिफितीचे नाव आहे. यात सुरेश भट यांनी लिहिलेल्या ओठ आसवांचे, बरसून हा असा चंद्र, तोरण, दिवस हे जाती कसे आदी गझलांचा समावेश आहे. या सर्व गझल्स आगाशे यांनी पॉप, रेगे, ब्लुज, रॉक, बॅलाड, सोलच्या साजात संगीतबद्ध केल्या आहेत. ८२ वर्षीय आशा भोसले यांनी ही सर्व गाणी गायली आहेत. या निमित्ताने एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्या विषयीची माहिती http://www.82pop.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.