83 Teaser: इतिहास पुन्हा नव्याने जगण्याची संधी, पाहा अंगावर शहारे आणणारा टीझर

’83’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

83, 83 teaser, ranveer singh, ranveer singh 83, ranveer singh 83 teaser,
२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित हा चित्रपट आहे.

२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अशातच आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ’83’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. ५९ सेकंदाच्या टीझरमध्ये १९८३ साली झालेल्या लंडनमधील लॉर्ड्स मैदानातील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना दाखवण्यात आला आहे. तसेच हा सामना पाहाण्यासाठी चाहत्यांनी केलेली गर्दी दिसत आहे. चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लॉर्ड्स मैदानात भारतीय संघाने रचलेला इतिहास पुन्हा नव्याने जण्याची संधी या चित्रपटाद्वारे मिळणार आहे.
आणखी वाचा : हे तर तू तुझ्या मुलीसोबत रोमान्स केल्यासारखं, तू सैफसोबत…; ‘अतरंगी रे’मुळे अक्षय कुमार ट्रोल

चित्रपटाचा टीझर शेअर करत रणवीरने ‘ही आतापर्यंतची सर्वांत चांगली कथा आहे. २४ डिसेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडा या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : शाहिद कपूर ते युवराज सिंह; एक्स गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या लग्नात ‘या’ स्टार्सने लावली होती हजेरी

’83’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या पूर्वी हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 83 teaser the guts and glory of ranveer singh team india avb

Next Story
कतरिनाच्या हातावर लागणाऱ्या मेहंदीची किंमत ऐकूण व्हाल थक्क
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी