‘प्रेम रतन धन पायो’मध्ये सलमानची सुवर्णजडीत शेरवानी

चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये सलमानने ही सुवर्णजडीत शेरवानी परिधान केली आहे.

salman khan,

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट दिग्दर्शक सुरज बडजात्याचा आतापर्यंतचा सर्वात भव्य चित्रपट ठरणार असल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच स्पष्टपणे अधोरेखित झाले होते. चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटावर सढळ हस्ते पैसा खर्च केल्याचे चित्रपटातील शाही थाटावरून लक्षात येते. या शाही थाटात आणखी एक भर पडली असून चित्रपटात सलमानने खास सुवर्णजडीत शेरवानी परिधान केली आहे.

‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात सलमान राजकुमाराच्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याखुबीने सलमानच्या वेशभुषेकडे खास लक्ष देण्यात आले आहे. रॉयल लूक येण्यासाठी रत्नजडीत हिरयांच्या हारासह सलमानची शेरवानी देखील तितकीच शाही असावी या हेतूने खास सुवर्णजडीत शेरवानी तयार करण्यात आली. चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये सलमानने ही सुवर्णजडीत शेरवानी परिधान केली असून डिझाईनर अलविरा खान आणि ऍशली रिबेलो यांनी ती डिझाईन केली आहे.

प्रेम रतन धन पायो चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटात सलमानसह अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेता नील नितेन मुकेश यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

salman khan,gold sherwani-759
‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात सलमानने खास सुवर्णजडीत शेरवानी परिधान केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A gold embroidered sherwani for salman khan in prem ratan dhan payo

ताज्या बातम्या