बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक ए आर रहमान यांची मुलगी खतीजाचा रियासदीनशी नुकताच निकाह पार पडला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. ए आर रहमान यांनी त्यांच्या सोशल मीडियावर मुलीच्या लग्नाचे आणि रिसेप्शन पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. ज्याचं सोशल मीडियावर सध्या बरंच कौतुक होताना दिसत आहे. एवढे प्रसिद्ध गायक असतानाही ए आर रहमान यांच्या मुलीची रिसेप्शन पार्टी मात्र साधेपणानं आयोजित करण्यात आली होती. ज्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे.

खतीजाच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खतीजा आणि गायक ए आर रहमान यांचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होताना दिसत आहे. बॉलिवूड कलाकार लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात पण प्रसिद्ध सेलिब्रेटी असूनही ए आर रहमानच्या मुलीच्या लग्नातील साधेपणा लोकांना भावला आहे. धामधूम, डीजे, पार्टी साँग यापेक्षा पाहुण्यांसमोर क्लासिकल गाण्यांचं सादरीकरण करण्यात आलं. सध्या या सर्व गोष्टींची जोरदार चर्चा होतेय.

Twinkle Khanna reacts on performing in Dawood Ibrahim party
ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”
Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
National Conference (NC) Party president Farooq Abdullah and Peoples Democratic Party (PDP) leader Mehbooba Mufti
इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार

आणखी वाचा- लैंगिक अत्याचार, मारहाणीबद्दल एंबरचं स्टेटमेंट खोटं? जॉनी डेपच्या चाहत्यानं केले गंभीर आरोप

सोशल मीडियावर फार कमी सक्रिय असणारे आणि केवळ आपल्या कामाशी संबंधित पोस्ट करणाऱ्या ए आर रहमान यांनाही मुलीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये रिसेप्शन पार्टीचं साधेपण दिसून येत आहे. अनेक युजर्सनी यावर कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा- “नव्या घरात बॉयफ्रेंड नाही…” लग्न आणि लिव्ह इनच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली अथिया शेट्टी

गेल्या वर्षी खतिजाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी रियासदीनशी साखरपुडा केला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. २९ डिसेंबर रोजी फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र या त्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. एआर रहमानच्या पत्नीचे नाव सायरा बानो आहे. त्या दोघांच्या वयात ६ वर्षांचे अंतर आहे. या दाम्पत्याला खतिजा आणि रहीमा या दोन मुली आहेत. एक मुलगा असून त्याचे नाव अमीन रहमान आहे.