अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे ती यावेळी चर्चेत आली आहे. या प्रकरणी केतकीवर बारा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात अल्या आहेत. तर न्यायालयाने तिला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या केतकीवर शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आदेश बांदेकर यांनी केतकीच्या त्या पोस्टवर निषेध केला आहे. “संस्कार आणि संस्कृती विसरून विधानं करणाऱ्यांबद्दल मला काहीच बोलायचं नाही. ज्येष्ठांचा आदर राखणं फार गरजेचं आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे याविषयी मी काहीही बोलू इच्छित नाही,” असे आदेश बांदेकर म्हणाले आहेत.

आणखी वाचा : लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहून माधुरीचे पती डॉ नेने, म्हणाले “मी यांना…”

आणखी वाचा : ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याप्रकरणी रवीना टंडनची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “भारत हा एक…”

केतकीने शरद पवार यांच्यावर कोणती पोस्ट शेअर केली होती.

‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही कविता तिने पोस्ट केली. ही आक्षेपार्ह पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadesh bandekar comments on ketaki chitales controversial post dcp
First published on: 16-05-2022 at 17:40 IST