"आई बाबा मी दररोज...", आदेश बांदेकरांच्या लेकाची 'ती' पोस्ट चर्चेत | aadesh bandekar suchitra bandekar son actor soham bandekar share instagram post after receive award nrp 97 | Loksatta

“आई बाबा मी दररोज…”, आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या पुरस्कार सोहळ्यानंतर सोहमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

“आई बाबा मी दररोज…”, आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर याने आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. सोहम बांदेकर हा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून छोट्या पड्यावर झळकतो. नुकतंच त्याला त्याच्या अभिनयाबद्दल स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार मिळाला. यानंतर सोहमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.

सोहम हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सोहमने स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटो तो आणि सुचित्रा बांदेकर दिसत आहे. यासोबत त्याच्या हातात स्टार प्रवाहचा पुरस्कारही पाहायला मिळत आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर सोहमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

“कोणाच्या तरी मागे मागे करा अन्…”, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

या पोस्टला कॅप्शन देताना तो म्हणाला, “कोणत्याही टीममध्ये मी नसावा. त्याचप्रमाणे कोणत्याही अभिनेत्यामध्ये मी नसावा. काहींच्या मते अभिनेता असणं म्हणजे फक्त तुम्ही. पण तुमच्या भावना, तुमचे हावभाव, तुमची उपस्थिती हे ही तेवढंच महत्त्वाचं आहे. पण खरं तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आणि वातावरणाबद्दलही ते तितकंच लागू होतं.”

धन्यवाद आई बाबा, मी सतत शिकत राहिन. दररोज काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न असेल. मी कुटुंबासोबत होणाऱ्या विविध मीटिंगमध्ये उपलब्ध नसतो हे समजून घेतल्याबद्दल सर्व कुटुंबियांचे आभार, असेही तो म्हणाला. यासोबत सोहमने लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने सर्वांचे आभार मानले आहे.

“मी आता नेल फाइल्स…”, ट्विंकल खन्नाने उडवली विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ची खिल्ली

दरम्यान “नवे लक्ष्य” ही सोहमची पहिलीच मालिका आहे. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. सोहम प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध नवे लक्ष्य मालिकेतून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्य गाथा या मालिकेत पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-04-2022 at 15:38 IST
Next Story
… अन् ‘त्या’ प्रश्नावरुन भर कार्यक्रमात मीका सिंगने केली शिवीगाळ!