‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची लोकप्रियता अजूनही कायम आहे. विविध ट्वीस्टमुळे ही मालिका नेहमीच चर्चेत असते. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी हा सोशल मीडियावर चर्चेत असतो. तो नेहमी विविध गोष्टींबद्दल पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच मिलिंद गवळीने प्रसिद्ध नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांची भेट घेतली. या निमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळीने नुकतंच या भेटीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तो कमलाकर नाडकर्णी यांच्या भेटीबद्दल सांगितले आहे. या भेटीदरम्यान मिलिंद गवळींना ही मालिका कशी मिळाली याचा खुलासाही त्याने केला आहे. त्याने या पोस्टला फार हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाट्याला जात नाही, पण….” ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या डायलॉगची प्रेक्षकांना भूरळ 

मिलिंद गवळींची पोस्ट

“ग्रेट भेट”
श्री कमलाकर नाडकर्णी , म्हणजेच आमच्या कमलाकर काकांना काल खूप दिवसांनी भेटायचा योग आला आणि खरंच छान गप्पा झाल्या, आणि आमच्या गप्पांमध्ये त्यांचं दिलखुलास हसणं , माझं मन प्रसन्न करून गेलं,

“आई कुठे काय करते “ही मालिकेचे सगळे भाग त्यांनी पाहिले आहेत, न चुकता ते बघतात, यामुळे अनिरुद्ध देशमुख ची भूमिका आणि त्या व्यक्तिरेखेचा प्रवास त्यांना चांगलाच परिचयाचा आहे, त्यांच्याकडून मला सतत कौतुकाची थाप मिळत आली आहे , त्यांनी सतत मला प्रोत्साहन दिलं आहे. काल असंख्य विषयांवर गप्पा झाल्या , त्यात एक खंत त्यांनी बोलून दाखवली, या मालिकेने जे असंख्य सामाजिक विषय हाताळले आहेत, याविषयी फार कमी लोकं लिहितात, या विषयांवर चर्चा आणि परिसंवाद व्हायला हवेत !

रत्नाकर मतकरी यांच्या ” गहिरे पाणी ” मालिकेत मी काम करत असतानाच्या काळात माझी कमलाकर काकांशी ओळख मतकरी काकांनी करून दिली होती, त्या दोघांची खूप घनिष्ठ मैत्री होती, ती मी पाहिली आहे आणि अनुभवली आहे, बरेच वेळेला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सिनेमा बघायला ते दोघ एकत्र बसायचे, Majid Majidi चा Iranian सिनेमा “ Colour of Paradise “ बघून त्यांच्या दिलखुलास गप्पा मी अनुभवल्या आहेत.

मैत्री असावी तर अशी वर्षानुवर्ष दिलखुलास गप्पा, दिलखुलास हास्यविनोद. त्यांच्या सानिध्यात आपल्याला राहायला मिळालं यातच मी धन् झालो होतो, त्यांच्या या अद्भुत दुनियेत मला त्यांनी सामील करून घेतलं हे माझं भाग्य, त्याच काळात एका कार्यक्रमात श्री कमलाकर नाडकर्णी यांच्या कन्येचा , म्हणजे नमिताशी माझा परिचय झाला, आणि नमिता मुळे “आई कुठे काय करते” चा अनिरुद्ध देशमुख करायला मला मिळाला.

काल श्री कमलाकर काकांनी “नाटकी नाटकं” हे त्यांचं पुस्तक मला त्यांनी भेट दिलं. सकाळी पुस्तक वाचायला घेतलं आणि त्या पुस्तकाची छानशी प्रस्तावना श्री रत्नाकर मतकरी यांनी लिहिली आहे. “ It’s All Divine Intervention “ एका ग्रेट माणसाची भेट आणि त्यांनी दिलेली एक ग्रेट भेट, असे कॅप्शन मिलिंद गवळींनी या पोस्टला दिले आहे.

आणखी वाचा : “दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने सांगितल्या खास आठवणी

मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेक लाइक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट करत छान, मस्त, ग्रेट भेट असे म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टवर अनेकजण कमेंट करता दिसत आहेत.