scorecardresearch

“…तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल” ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘संजना’ची पोस्ट चर्चेत

यात ती अगदी पारंपारिक रुपात श्रीकृष्णाची पूजा करताना दिसत आहे.

“…तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल” ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘संजना’ची पोस्ट चर्चेत
रुपाली भोसले

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. त्यात संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही घराघरात प्रसिद्ध आहे. रुपाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. रुपालीने नुकतचं तिच्या सोशल मीडियावर एक भक्तीमय व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

रुपालीने गोकुळाष्टमीच्या निमित्ताने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती श्रीकृष्णाची पूजा करताना दिसत आहे. यात ती अगदी पारंपारिक रुपात श्रीकृष्णाची पूजा करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
पतौडी पॅलेस ८०० कोटी रुपयांना विकत घेण्यामागचे कारण काय? सैफ अली खानने केला खुलासा

“कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख, मिळून कृष्ण भक्तीत सारे. हरी गुण गाऊ एकत्र, अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हांला मागावे लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!” असे रुपालीने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.

…म्हणून ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘संजना’ वर्षातून दोनदा साजरा करते वाढदिवस

दरम्यान तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर आणि व्हिडीओ अनेकजण कमेंट करत त्यांचे मत मांडताना दिसत आहे. तसेच आज गोपाळकालाच्या निमित्ताने ठिकठिकाणी उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. मुंबईसह सर्वत्रच दहीहंडी पथकांचा जल्लोषही पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या