छोट्या पडद्यावरील सध्याची अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या जवळपास २६ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आता अनिरुद्ध लवकरच संजनाशी लग्न करणार आहे. दरम्यान लग्नाच्या एक दिवस आधी अनिरुद्ध घरातून गायब असल्याचे संजना कळते. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी साकारताना दिसत आहेत. त्यांनी स्वत: ‘अनिरुद्ध देशमुख हरवला आहे’ अशी मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनिरुद्धाचा फोटो लावण्यात आला आहे आणि सर्वात वरती अनिरुद्ध देशमुख हरवला आहे असे लिहिण्यात आले आहे.

Raj Kundra shares cryptic note amid ponzi scam
ईडीने ९७.७९ कोटींची संपत्ती जप्त केल्यावर राज कुंद्राची पोस्ट; ‘तो’ फोटो शेअर करत लिहिलं, “जेव्हा तुम्हाला…”
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
sharmila tagore property
“मी खरेदी केलेली संपत्ती माझ्याच नावावर”, शर्मिला टागोर यांची माहिती; म्हणाल्या, “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची…”
funny Puneri patya video
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”

आणखी वाचा : ‘आमच्या पप्पांच्या लग्नाला यायचं हं’, संजना-अनिरुद्धच्या लग्नाची मजेशीर पत्रिका व्हायरल

aai kuthe kay karate, aai kuthe kay karate fans, aniruddha deshmukh,

या पोस्टमध्ये पुढे राहणार बोरिवली, समृद्धी बंगला, वर्ण- गोरा, उंची ५ फूट ५ इंच असे लिहिले आहे. जर अनिरुद्ध कुणाला सापडला तर संजना दीक्षितशी संपर्क करण्यासाठी तिचा नंबर देण्यात आला आहे. या पोस्टच्या खाली ‘तरी हा माणूस कुणाला दिसल्यास किंवा आढळ्यास त्वरित संपर्क साधावा’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच माहिती देणाऱ्यास लग्नाला बोलावण्यात येईल असे देखील म्हटले आहे. अभिनेता मिलिंद गवळीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत ‘कुठे आहे अनिरुद्ध’ असे म्हटले आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहून सर्वांना हसू अनावर झाले आहे.