‘आई कुठे काय करते’मधून अरुंधतीने घेतला ब्रेक?

गेल्या काही दिवसांपासून ती मालिकेत दिसत नाही

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील अरुंधतीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादू केली आहे. अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर साकारताना दिसत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ती मालिकेत दिसत नाही. त्यामुळे अरुंधतीने मालिकेतून ब्रेक घेतल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अरुंधती ही मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे अरुंधती मालिकेत का दिसत नाही? नेमकं काय झाले? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. पण मधुराणीची तब्बेत ठिक नसल्यामुळे तिने काही दिवस चित्रीकरणातून सुट्टी घेतली आहे. त्यामुळे ती मालिकेच्या भागांमध्ये दिसत नाहीये. मधुराणी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत.
आणखी वचा : ‘गहराइयां’मध्ये सिद्धांत-दीपिकाचा बोल्ड सीन पाहून रणवीर म्हणाला…

नुकताच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अभि-अनघाच्या लग्नाचा थाट पाहायला मिळाला. त्यांच्या लग्नातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच कलाकारांनी लिहिलेल्या पोस्ट पण चर्चेत होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte arundhati aka madhurani prabhulkar took a break from serial avb

Next Story
सैफ अली खानचा मुलगा डेट करतोय ‘या’ अभिनेत्रीच्या मुलीला? फोटो चर्चेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी