आई कुठे काय करते : संजना म्हणजेच रुपालीने सांगितल्या पावसाळ्यातील तिच्या आठवणी

रुपाली भोसल सध्या मालिकेच्या चित्रकरणासाठी सिल्वासा इथे आहे.

aai kuthe kay karte fame actress rupali bhosle talked about her monsoon memories
रुपाली भोसल सध्या मालिकेच्या चित्रकरणासाठी सिल्वासा इथे आहे.

पावसाळा हा सर्वांचा आवडता ऋतू म्हणून ओळखला जातो. पावसाळा आला की सृष्टीचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. यामुळे प्रत्येकाला पावसाळा हवाहवासा वाटतो. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेचा देखील पावसाळा हा आवडता ऋतू आहे. पावसात भिजण्याची एकही संधी रुपाली सोडत नाही.

दरवर्षी मित्रमंडळींसोबत बँड स्टॅण्डला जाऊन पावसात मनसोक्त भिजणं, मक्याचं कणीस आणि आईस्क्रीम खाणं हे तिचं ठरलेलं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे हे शक्य झालं नाही. पण मालिकेचं शूटिंग सध्या सिल्वासा इथे सुरु असल्यामुळे सेटवरच तिने भिजण्याचा आनंद लुटला आहे.

रुपालीने पावसाळ्यातील तिच्या आठवणी देखील सांगितल्या आहेत. “मी विरारला रहाते. माझ्या बाल्कनीत तर मी छोटीशी बागच तयार केलीय. पावसाळ्यात तर इथला नजारा मन प्रसन्न करुन टाकणारा असतो. याच दरम्यान मोगऱ्याला बहर येते. घरभर पसरणारा मोगऱ्याचा सुवास मन मोहित करुन टाकतो,” असं रुपाली म्हणाली.

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

पुढे रुपाली म्हणाली, “यंदा तर माझ्या आईने काकडीची वेलही लावली आहे. त्यामुळे घरगुती काकडीचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. विरारला रहात असल्यामुळे डोंगर, हिरवळ हे खूप जवळून अनुभवता येतं. पावसामुळे वातावरणात आलेला गारवा, डोंगराच्या कुशीतून मनसोक्त उधळणारे धबधबे हे मला खूप आवडतं. त्यामुळे पाऊस माझ्या खूप जवळचा आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aai kuthe kay karte fame actress rupali bhosle talked about her monsoon memories dcp