कलाक्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयासोबत एक उत्तम बिझनेससुद्धा करतात. या यादीत आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री राधिका देशपांडे सामील झाली आहे. मालिकेत राधिका अरूंधतीची खास मैत्रिण देविकाची भूमिका साकारताना दिसते. आता राधिकाने नवीन बिझनेस सुरू केला असून याची माहिती तिने सोशल मीडियावर सांगितली आहे.

राधिकाला तिच्या देविकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. यातील तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. अभिनयासोबतच ती एक उत्तम लेखिका आणि दिग्दर्शक देखील आहे. ‘होणार सून मी या घरची’, ‘स्वराज रक्षक संभाजी’, ‘लक्ष्य’ सारख्या अनेक मालिकेत तिने काम केले आहे. राधिकाने ‘राधिका क्रिएशन’ या नावाची नवीन अॅक्टिंगची स्कूल सुरू केली आहे. या शाळेच्या माध्यमातून लहानमुलांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच या मुलांना घेऊन काही प्रयोग देखील सादर केले जातील.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

राधिकाने या संबंधित अनेक पोस्ट तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर केल्या आहेत. ती ‘राधिका क्रिएशन’ सोबतच ‘Twiosintl’ या ब्रॅंडची संस्थापक असून याचं नावाने इन्स्टाग्राम अकाऊंट देखील आहे. या अकाऊंटवर तुम्ही या ब्रॅंडमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते पाहू शकता.