कलाक्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयासोबत एक उत्तम बिझनेससुद्धा करतात. या यादीत आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री राधिका देशपांडे सामील झाली आहे. मालिकेत राधिका अरूंधतीची खास मैत्रिण देविकाची भूमिका साकारताना दिसते. आता राधिकाने नवीन बिझनेस सुरू केला असून याची माहिती तिने सोशल मीडियावर सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राधिकाला तिच्या देविकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. यातील तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. अभिनयासोबतच ती एक उत्तम लेखिका आणि दिग्दर्शक देखील आहे. ‘होणार सून मी या घरची’, ‘स्वराज रक्षक संभाजी’, ‘लक्ष्य’ सारख्या अनेक मालिकेत तिने काम केले आहे. राधिकाने ‘राधिका क्रिएशन’ या नावाची नवीन अॅक्टिंगची स्कूल सुरू केली आहे. या शाळेच्या माध्यमातून लहानमुलांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच या मुलांना घेऊन काही प्रयोग देखील सादर केले जातील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame actress started new business aad
First published on: 22-09-2021 at 12:16 IST