‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीची आई करते ‘या’ हिंदी मालिकेत काम

‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधतीची आई साकारणाऱ्या मेधा जांबोटकर यांनी मालिकेतील भूमिकेबद्दल एका मुलाखतीत सांगितले आहे की….

aai-kuthe-kay-karte
Photo-Loksatta file image

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिके लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील कथा, उत्तम लेखन, दिग्दर्शन आणि यातील कलाकारांच्या अभिनयामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असे स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत सध्या अरुंधती आणि अनिरुद्धच्या घटस्फोटाचा ट्रॅक पहायला मिळत आहे. अरुंधती घर सोडून तिच्या माहेरी गेली आहे. ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधती तिच्या आईची समजूत काढताना दिसते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की अरुंधतीची आईची भूमिका साकारणाऱ्या मेधा जांबोटकर अजून एका लोकप्रिय मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसते.

‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधतीची आईची भूमिका साकारणाऱ्या मेधा स्टार प्लसवर ‘ये रिश्ता क्या कहलाता  है’मध्ये नायरच्या आजीची भूमिका साकारताना दिसतात. ‘टेली चक्कर’ या वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘आई कुठे काय करते’ मध्ये अरुंधतीच्या आईची भूमिका कशी मिळाली ते सांगितले. त्या म्हणाल्या की, मी खूप नशीबवान आहे की मला आई कुठे काय करते या मालिकेत काम करायची संधी मिळाली. माझी यात पाहुण्या कलाकाराची  भूमिका आहे. आणि मला ही भूमिका खूप गोड वाटली म्हणून मी या  भूमिकेसाठी हो बोलले.”

प्रेक्षकांना ‘आई कुठे काय करते’मधील सौवादा खास करुन अरुंधतीचे संवाद ऐकायला आणि बघायला आवडतात. असे मेधा यांनी मुलाखतीत सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, ” दोन्ही मालिका एकाच प्रॉडक्शन हाऊसच्या आहेत त्यामुळे ते माझी काळजी घेतात. मला कधी कधी एका दिवसात दोन सेटवर काम करावे लागते. मात्र मला आनंद आहे की दोन्ही  शो उत्तम सुरु आहेत.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aai kuthe kay karte fame medha jambothkar opens up about playing two roles at a time aad

ताज्या बातम्या