scorecardresearch

“वय कितीही असो, तुम्हाला नेहमी तिची गरज असते…”, अनिरुद्धची ‘कांचन आई’साठी खास पोस्ट चर्चेत

अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेतील सर्वच पात्र ही कायमच चर्चेत असतात. पण या मालिकेतील अरुंधती आणि अनिरुद्ध या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळींनी नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी आई कांचन हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर हिच्याबद्दल मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत.

अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी मालिकेतील आईचे पात्र साकारणाऱ्या अर्चना पाटकर हिच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो एका फोटोशूटमधील असल्याचे दिसत आहे.

हे फोटोशूटमधील फोटो शेअर करताना त्यांनी त्यासोबत एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. मिलिंद गवळी म्हणाले, “तुमचे वय काहीही असो, तुम्हाला नेहमी आईची गरज असते. अर्चना पाटकर, ज्यांना आम्ही अर्चु ताई असे लाडाने आवाज देतो. सर्वांच्या लाडक्या, आनंदी, फूडी, खोडकर, प्रेमळ, काळजी घेणारी, सदैव हसतमुख असणाऱ्या…, ती माझी पडद्यावरची आई आहे.”

“सून लाडकी सासरची २००५ या मराठी चित्रपटात तिने माझ्या आईची भूमिका केली होती. त्यानंतर पुन्हा इतक्या वर्षांनी आई कुठे काय करते या मालिकेच्या निमित्ताने २०१९ ते २०२२ पर्यंत ती माझ्या आईची भूमिका साकारत आहे. नियतीमुळे हे शक्य झालंय.” असे मिलिंद गवळींनी म्हटले.

ललित प्रभाकरने शेअर केला शर्टलेस फोटो, म्हणाला “प्रश्न पोटा पाण्याचा…”

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या रजंक वळणावर आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या घटस्फोटानंतर ती सध्या चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. आशुतोषच्या नव्या अल्बममध्ये गाणे गात असल्यामुळे ती सर्वत्र मुक्तपणे वावरताना दिसत आहे. त्यानंतर आता अनघा ही संजनाला घरकाम करायला लावणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte fame milind gawali aka aniruddha special post to archana patkar kachan nrp

ताज्या बातम्या