लोकांनी शिव्या दिल्या की…; ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी साकारत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील सर्वच पात्र ही कायम चर्चेत असतात. पण अरुंधती आणि अनिरुद्ध या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळीची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याने मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत.

मिलिंद ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकजण त्याला सुनावत असतात. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकेतील एक भाग शेअर केला आहे. हा भाग शेअर करत, ‘दुसऱ्याचा विचार न करणारी आणि दुसऱ्याच्या मनाला लागेल असं बोलणारी काही माणसं असतात. त्यातलाच हा अनिरुद्ध देशमुख. फारच उर्मट, धाकट्या भावाला वाटेल ते बोलणार, त्याच्या मनाला लागेल असं बोलणारा, फक्त चुका दाखवून द्यायच्या, मदत करायची नाही. अशी असंख्य माणसं असतात अनिरुद्ध सारखी या समाजामध्ये, बोलताना समोरच्याच्या मनाचा अजिबात विचार करायचा नाही, त्याची काय अडचण आहे ते समजून घ्यायचं नाही’ असे म्हटले आहे.
Video: ‘तुझा नवरा भाड्याने आणलास’, राखी सावंत आणि अभिजीत बिचुकलेमध्ये जबरदस्त राडा

पुढे तो म्हणाला, ‘आपण किती शहाणे आहोत आणि बाकीच्यांना काहीच कळत नाही, असं आयुष्यभर वावरत राहायचं. मला ही अशी माणसं बरीच भेटली. आपण अडकलेलो असतो, आपल्याला गरज असते, म्हणून गप्प बसायच, ऐकून घ्यायचं. कुणाच्या ना कुणाच्या तरी जवळच असतो, मग आपण बोललो तर आपल्याच जवळच्या माणसांना वाईट वाटेल, या भीतीने आपण उलट उत्तर द्यायची नाहीत. सगळं ऐकून घ्यायचं, पण मनाला खूप त्रास होतो. नको वाटतो त्या माणसाशी आयुष्यात कधीही संबंध ठेवायला, मी तर लांब पळतो अशा माणसांपासून, नको त्यांची तोंड बघायला आणि आपलं तोंड नको त्याला दाखवायला, आपण भले आपलं जग भलं. मी जेव्हा अनिरुद्ध देशमुखची भूमिका करतो, तेव्हा हीच माणसं माझ्या डोळ्यासमोर असतात, या सिच्युएशनमध्ये ही माणसं कसं बोलतील याचा विचार करतो आणि मग बिनधास्त बोलतो. मग काय, खातो असंख्य लोकांच्या शिव्या, स्पेशली बायकांच्या. पण शिव्या मिळाल्या की मला आनंद होतो. म्हणजे, असल्या लोकांना मला शिव्या देता आल्या नाहीत, तरी माझ्या वतीने लोक अनिरुद्धला नाही तर त्यांना शिव्या देतात असं वाटतं मला.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aai kuthe kay karte milind gawali aka anirudha post viral on social media avb

ताज्या बातम्या