“जर अनिरुद्ध सुधारलेला असेल तर…”, ‘आई कुठे काय करते’मधील मिलिंद गवळींची खास पोस्ट

पण तरी मला याबाबत काहीही तक्रार नाही.

aai kuthe kay karte milind gawali madhurani prabhulkar
मिलिंद गवळी

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे दिसते. नुकतंच मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे आभार मानले आहेत.

आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांचे अनेक चाहते हे त्यांच्यासोबत हात मिळवताना दिसत आहे. तर काहीजण हे त्यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत. या पोस्टला त्यांनी भलेमोठे कॅप्शन दिले आहे.

“दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने सांगितल्या खास आठवणी

मिलिंद गवळींची पोस्ट

“माझी माय सरस्वती, मला शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली “
किंवा “अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर .”

ज्या ज्या वेळेला मी या माउलींना भेटतो, ज्यांच्या कपाळावर गोंधलेलं असत, छान जरी काठाची साडी नेसलेली असते, डोक्यावर पदर असतो, छान मोठं कुंकू लावलेलं असतं, हातात पाटल्या बांगड्या आणि खासकरून हिरव्या बांगड्या असतात, चेहऱ्यावर माया, प्रेम, समाधान, आनंद आणि आशीर्वाद असतो, त्या प्रत्येक माऊलीमध्ये मला माझे माय दिसते आणि आता “आई कुठे काय करते” या मालिकेमुळे या सगळ्या माऊल्या मला आशीर्वाद देण्यासाठी धडपडत असतात.

याला मी माझं भाग्य समजतो, भाग्य शिवाय हे शक्य नाही, म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, तरी अनिरुद्धची भूमिका करणारा मी, तरीसुद्धा इतके आशीर्वाद, जर अनिरुद्ध सुधारलेला असेल तर आणखीन किती मनापासून ते आशीर्वाद देतील. पण तरी मला याबाबत काहीही तक्रार नाही. हा आईचा आशिर्वादचं आहे”, असे त्याने ही पोस्ट करताना म्हटले आहे.

“अरुंधतीच्या आईला त्रास देण्याचे सिन लिहू नकोस नाहीतर…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

त्याच्या या पोस्टला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. तसेच त्याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान सध्या आई कुठे काय करते या मालिकेत चांगली रंजक वळणे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे अनघाचा जिन्यावरून पडून अपघात झाला आहे. तर, दुसरीकडे यशवर खुनाचा आरोप लागला आहे. आपल्या मुलांना या संकटांमधून बाहेर काढण्यासाठी अरुंधती पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात परतत असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte milind gawali aka anirudha share instagram post viral nrp

Next Story
“मी सलमानला घाबरत…” जेव्हा अर्पिता खानशी ब्रेकअपवर अर्जुन कपूरनं दिलं होतं स्पष्टीकरण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी